मुख्य विभाग

स्वागतकक्ष पर्यटन मंदिरे श्री बनशंकरीचे देवस्थान
श्री बनशंकरीचे देवस्थान पीडीएफ प्रिंट ई-मेल

जत तालुक्यातील ठिकाणापासून उत्तरेल १२ किलोमीटर पाच हजार लोकवस्तीचे गाव आहे.गावाशेजारील छोटया डोंगराच्या कुशीत हिरवेगार घनदाट बन आहे.या गर्द वनराईत श्री बनशंकरीचे देवस्थान आहे.कायम दुष्काळी गावात बसलेले हे ठिकाण वाळ्वंटातील ओअ‍ॅसिसप्रमाणे एक सुंदर पर्यटनस्थळ आहे.

चारी बाजूला छोटया टेकडया, मधोमध लहानशी दरी. दरी मध्ये आंबा, चिंच, जांभूळ, पिंपळ, वड, नीलगिरी, सीताफळ व रामफळाचे उंचच उंच वृक्ष आहेत.एकाने मंदिरच्या शेजारी गावकरयाच्या मदतीने मोठी विहीर खणली.विहीरीला भरपुर पाणी लागल्याने परिसरातील २५ एकरांत वृक्षारोपण करण्याचे ठरले.त्यानुसार तिन्ही भक्तांनी ग्रामस्थांच्या मदतीने परिसरात झाडे लावली.तालुक्यात सर्वत्र वैराण माळरान असताना येथे मात्र हिरवेगार बन आहे.

देवावरील भक्तीमुळे संपूर्ण बनाळी गाव शाकाहारी आहे.देवदर्शनाबरोबर वनभोजन आणि बनातून फेरफटका मारण्याचा आंनद घेता येतो. वर्षातील बाराही महीने येथे वातावरण आल्हाददायक असते.