मुख्य विभाग

स्वागतकक्ष पर्यटन प्रेक्षणीय स्थळे कवठेएकंदची सप्तरंगी आतिषबाजी
कवठेएकंदची सप्तरंगी आतिषबाजी पीडीएफ प्रिंट ई-मेल

कवठेएकंदची सप्तरंगी आतिषबाजी
कवठेएकंद(तासगाव) तेथे विजया दशमीला बिर्‍हाडसिध्दराज देवाच्या पालखी सोहळ्या निमित्त शोभेच्या दारूची सप्तरंगी आतषबाजी केली जाते.विज्ञान युगात उपलब्ध होणार्‍या नवनवीन तंत्रांच्या साह्याने होणारी आतषबाजी म्हणजे कवठे एकंदचा दसरा महोत्सव होय.

येथे अन्य राज्यांतूनही लोक शोभेच्या दारूची आतषबाजी पाहण्यासाठी दरवर्षी येतात.सारा गाव आपल्या घरातील सण म्हणून यात सहभागी होतो.आतषबाजी डोळ्यांचे पारणे फेडणारी असते.कवठेएकंद गाव सांगली-तासगाव रस्त्यावर सांगलीपासून उत्तरेस वीस किलोमीटर व तासगावापासून दक्षिणेस सहा किलोमीटरवर आहे. श्री बिर्‍हाडसिध्दराज हे गावाचे आराध्य दैवत आअहे.मंदिर एखाद्या भुईकोट किल्ल्या प्रमाणे आहे. पेशव्यांचे सरसेनापती परशुराम भाऊ पटवर्धन याची तलवार ऎतिहासिक दृष्टया महत्वाची आहे.

एक शिवकालीन मोहर तळपत आहे.मध्यभागी शिवपिंड,लगतच नागभूषण व श्री ची सारी प्रभावळ आहे.मंदिराच्या बाहेर भांधीव विहिरीस ’पुष्करिणी तीर्थ’किवा ’सागरकुप’या नावाने ओळ्खले जाते.मंदिराचे शिखर दक्षिणात्य पध्दतीचे आहे.त्यावरील सोनेरी कळस लक्षवेधी आहे.या परिसरात एक एकरात मनमोहक उद्यान उभे करण्यात आले आहे.विजय दशमीला रात्री नऊ वाजता फुलांनी सुशोभित केलेल्या पालखीतून मिरवणूक सुरू होते.त्या वेळी शेकडो औट उडवून सलामी दिली जाते.त्यानंतर पालखी गावाबाहेरील चबूतर्‍यावर आल्यावर आपटयांच्या पानांची पूजा होते.तेथून तेव्हा बिरोबाची पालखी येते.दोन्ही पालखीच्या भेटीचा कार्यक्रम होतो.सिध्दराजा पालखी बरोबर अंगरक्षक म्हणून बिरोबाची पालखी असते.हर-हर..च्या जयघोषात शोभेच्या दारूच्या आतषबाजीस प्रारंभ होतो.

बस्थानका पासून देवघरा पर्यत एक किलोमीटर मार्गावर आतषबाजी सुरू असते. आतषबाजी करणारे सुमारे दोनशे ते तीनशे अड्डे आहेत. या अड्डया मार्फत पालखी पुढे सरकेल तशी आतषबाजी केली जाते. त्यात प्रामुख्याने शिंगट, औट, चक्र, मोर, फुगडी, दांडपट्टा, अग्नीबाण, मुलूखमैदान तोफ, स्वागतकमान, सुरूची झाडे. भुसनाळे यांशिवाय पांढर्‍या रंगाच्या ठिणग्यांचा झोत,धबधबा दाखवला जातो.शॆकडो प्रकारे आतिषबाजी केली जाते.दुसर्‍या दिवशी सकाळी आठपर्यत पालखी देवघरात पोहोचते.तेथील भेटीचा कार्यक्रम होऊन आरती होते.आणि परतीचा प्रवास सुरू होतो.