मुख्य विभाग

स्वागतकक्ष पर्यटन मंदिरे संभुअप्पा समाधी
संभुअप्पा समाधी पीडीएफ प्रिंट ई-मेल

तीनशे वर्षाची पंरपरा असलेली इस्लामपूची तेथील संभुअप्पा उरूस हिंदू-मुस्लिम ऎक्याचे प्रतीक आहे.संभुअप्पा समाधिस्थळ परिसर शहराचे सांस्कृतिक संचित आहे.राज्यभरातील व कर्नाटकातील भाविकांची परिसराचे वैशिष्टय आहे.पौर्णिमेचा दिवस संभूअप्पांचा जन्मदिवस मानला जातो.या कालावधीत पंधरा दिवस उरूस भरतो.इस्लामपूर लगतच्या पूर्वीच्या यमाई तलावाच्या पूर्वेस प्रशस्त जागेत मठ उभारला आहे.मठाभोवती भव्य तंटबंदी व बुरुज आहेत. मुख्य प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूला खोल आड आहे. डाव्या बाजूला बाग आहे. समाधिस्थळासमोर लिंबाचे झाड आहे.भंडारमाळी, नगारखाना, सोनार सोपा अशा इमारती आहेत.

शाहीर बापूराव विभूते,शाहीर यशवंत पवार यांनी संभूअप्पांचे चरित्र पोवाड्यांद्वारे गायले आहे. श्री संभूअप्पा यांनी कुराणाची प्रत लिखित स्वरूपात तयार केली होती.शहर व परिसरात संभुअप्पा उरूस हा संस्कृतीचे प्रतीक म्हणून सर्वपरिचित आहे.संभूअप्पा मठात वर्षभर खंडे प्रतिपदा पूजन,ग्लेफ ,गुरूप्रसाद, भासणे, गंधरात्र, भंडारा, गोपाळकाला, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, गणेशत्सव असे कार्यक्रम होतात.वर्ष भरातील धार्मिक कार्यक्रमांना भाविकांची गर्दी असते.