मुख्य विभाग

दंडोबा हिल स्टेशन पीडीएफ प्रिंट ई-मेल

मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील दुष्काळ पट्टा असूनही पाहण्यासारखे आणि पाहिल्यानंतर लक्षात राहण्यासारखे कोण्ते निसर्गरम्य ठिकाण असेलतर डोंगर भोसे,मालगाव,सिध्देवाडी या ग्रामपंचायतीच्या हद्दीत दंडोबा हा डोंगर पसरला आहे.देशिंग गावाच्या हद्दीत डोंगरावर महादेवाचे स्वयंभू स्थान आहे. डोंगरावर वन विभागाने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्याने जुनी व नवीन अशी फार दाट झाडी आहे. नानविधि प्रकारची वनराई, डोंगर पोखरून तयार करण्यात आलेली मंदिरे ही येथी वैशिष्टये आहेत.येथे अतिशय थंडावा आहे.तेथे काही चित्रेही कोरण्यात आली आहेत. ती आता पुसट झाली आहेत. तेथूनच पुढे केदारलिंगाची गुंफा आहे.पंचवीस फूट पोखरून ती तयार केली आहे.श्रावणात दर सोमवारी येथे यात्रा भरते.

सहलीसाठी हे ठिकाण अतिशय खास आहे.रिमझिम पावसात भिजत डोंगर फिरून पाहण्याची मौज काही वेगळीच असते. सर्वत्र हिरवागार परिसर.सर्वच तळी फुलवेली,असे प्रसन्न वातावरण मन मोहवणारे असते.छायाचित्रे घेण्यासाठी हा चांगला ’स्पॉट’आहे. दंडनाथ मंदिराच्या समोरील पायवाटेने दक्षिणेकडे अर्धा किलोमीटर चालत गेल्यानंतर  जैनधर्मीयांनी बांधलेल्या बस्तीचे अवशेष दिसतात. तेथे पशुपालन व्यवसायाला या डोंगरानेच मोठा आधार दिला आहे. अनेक छोटया,छोटया तुकडयात शेती विखुरली आहे.

मिरज-पंढरपूर रस्त्यावर भोसे गाव आहे.तेथून पूर्वेला एक किलोमीटर वर दंडोबा डोंगरावर जाण्यास रस्ता आहे.