सांगली शिक्षण संस्था प्रिंट
लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय विचाराच्या शिक्षणसंस्थाची गरज ब्रिटीश काळात व्यक्त केली होती.या विचारांनी प्रेरित होऊन धोंडी विठ्ठ्ल सुखदेव,विनायक सदाशिव जोशी,गुरूनाथ गोविंद तोरो आणि राजाराम चिकोडीकर यांनी ४ डिसेंबर १९१४ रोजी सिटी स्कूल ची स्थापना केली.हीच शाळा शाळा पुढे ’सांगली शिक्षण संस्थे’रूपांतरीत झाली.आता बालवाडी ते उच्चमाध्यमिक,सैनिकी शाळा,बी.एड.कॉलेज अशी ३२ विद्यालये आहेत.त्यांत सुमारे २० हजार विद्यार्थी शिक्षणाचा आग्रह धरणारी शिक्षण संस्था म्हणून या संस्थेचा लौकिक आहे.नितीन खाडीलकर,ज.भा.लिमये या नव्या पिढीकडे संस्थेची धुरा आहे.गुणवत्तापूर्ण सिक्षणासाठी जिजामाता शिष्यवृती परीक्षा घेतली जाते.या परीक्षेत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळातील विद्यार्थी सहभागी होतात.इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचे पाऊलही संस्थेने उचलले असून,इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होता आहेत.