मुख्य विभाग

स्वागतकक्ष साहित्य कविता नवीन राष्ट्रभक्तीपर गीत
नवीन राष्ट्रभक्तीपर गीत पीडीएफ प्रिंट ई-मेल
२६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन,।
य़ा दिवशी ध्वजवंदनाचेवेळी गाण्यासाठी नवीन राष्ट्र्भक्तीपर गीत

विकसित करूया खेडीपाडी, उत्कर्षाची ही चाल ।
आपण सार घडवू अपुल्या, देशाचा वैभवकाल ॥धॄ॥
वरुन शांत जरी दिसतो आम्ही, आग घुमसते हृदयात ।
घराघरामधी जाउनी आम्ही, पेटवू प्रेमाची ज्योत ।
एकसंघ भारत हा आमुचा, असाच राहील चिरकाल ॥१॥
आक्रमकाना सीमेवरती, पाजू पाणी शस्त्रांचे ।
कधी न होईल धाडस त्यांचे, सीमेवर मग येण्याचे ।
शस्त्रसज्ज भारत हा अमुचा, घालील विजयाची माळ ॥२॥
पवित्र अमुची भारतमाता, वंदन करूया भक्तीने ।
कणाकणातून जागॄत होइल, स्वाभिमान तो चैतन्ये ।
विश्वशांती हे ध्येय आमुचे, स्फूर्त्ती देइल चिरकाल ॥३॥
भेदभाव हे विसरून सारे, राष्ट्रकार्य हे प्रथम करु ।
बंधुत्वाची शक्ती देईल, समर्थ भारत निर्माण करू ।
मातृभूमिला वैभवी चढवू, जगद वंद्य ती होईल ॥४॥

प्रा. एच.यू. कुलकर्णी