मुख्य विभाग

स्वागतकक्ष नाट्यसंमेलन पूर्वीची नाट्यसंमेलने ६९वे नाट्यसंमेलन भाग ५- डॉ. मधू आपटे
६९वे नाट्यसंमेलन भाग ५- डॉ. मधू आपटे पीडीएफ प्रिंट ई-मेल
नाटककारांच्या दिंड्या

६९ वा व्या सांगली नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने सांगलीच्या तीन आणि मिरजेची एक अशा चार ' दिंडी ' 'कार्यक्रमाची संपूर्ण आखणी श्री बाळासाहेब गलगले यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी रित्या करण्यात आली आणि त्यामुळे संपूर्ण सांगली "नाट्य संमेलनाच्या "अनोखी वातावरणाने भरून गेली त्यामुळे पुढील सर्व कार्यक्रम रंगत गेले आद्य मराठी आणि व्यावसायिक मराठी रंगभूमीचे प्रणेते 'विष्णुदास भावे ' यांच्या प्रमाणे कृष्णा तीरावर नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, आणि हरिपूर येथे गोविंद बल्लाळ देवल या नाट्य त्रयींचा अधिकार आहे. यामध्ये अलीकडेच प्रकाशात आलेले रंग सारंग बळवंत भास्कर मराठे ह्या हरिपूरच्या यशस्वी नाटककाराचा समावेश त्यावेळी करता आला नाही, कारण त्यावेळी त्यांचेबद्दल माहिती झाली नव्हती.

तर पहिली 'दिंडी' सांगलीच्या नदीकिनारी असलेल्या ' विष्णुदासांच्या निवसापासून काढण्यात आली, गम्मत अशी कि हे जुने दुमजली घर श्री सनदी ह्या मुस्लीम गृहस्थाने विकत घेतले होते. विष्णुदासांच्या दिन्डीबद्दल जेंव्हा त्यांना समजले, त्यावेळी ते अत्यंत भावूक झाले. एवढ्या प्रख्यात व्यक्तीच्या मूळ निवासात आपण राहत आहोत हे कळल्यावर, त्यांनी ह्या घरातून निघणाऱ्या दिंडीसाठी पूर्ण सहकार्य केले. त्यांच्या घरात विष्णुदास यांच्या प्रतिमेचे यथासांग पूजन, आरती ‘विष्णुदास गौरव गीत’ आणि नांदी असा कार्यक्रम झाला आणि विष्णूदासाची प्रतिमा पालखीत ठेवली आणि ही पालखी प्रसिद्ध अभिनेते सुर्यकांत यांनी आपल्या खांद्यावर सश्रद्ध भावाने वाहून नेण्यास सुरुवात केली. दिंडी गावभागातून टिळक स्मारक आणि तेथून भावे नाट्य मंदिर प्रचंड रसिकांच्या गर्दीत नेण्यात आली. आणि भावे नाट्य मंदिरातून राजवाडा परिसरातील मुख्य मंडपात नेण्यात आली

६९व्या सांगली नाटय संमेलनातील तिसरी महत्वाची दिंडी कृष्ण -वारणा नदी संगमावरील ' हरीपुरहून' नाट्य दिग्दर्शक नाटककार श्री. गोविंद बल्लाळ देवल यांची ! संपूर्ण हरिपूर ह्या दिंडीत ताल मृदंगाचे गजरात सामील झाले होते, देवल यांच्या वास्तू मधून ह्या ' पहिल्या नाट्य दिग्दर्शक कुळाचे कुलगुरू 'ची दिंडी अत्त्यंत उत्साहात प्रतिमा पूजन केल्यावर निघाली आणि ती थेट हरिपूर -सांगली रस्त्याने भावे नाट्य मंदिरात आली आणि तिथून राजवाडा परिसरातील संमेलन मंडपात दाखल झाली

याशिवाय मिरजेहून नाटककार वासुदेव शास्त्री खरे यांच्या प्रतिमेची दिंडी मिरजकारांनी मोठ्या थाटात आणि अपूर्व उत्साहात आणली. ती राम मंदिर कोपर्‍यावरून जुन्या स्टेशन मार्गे राजवाड्यात दाखल झाली. एकूणच ह्या चार दिंड्यांनी संमेलनाच्या वातावरणात उत्साह आणला