मुख्य विभाग

स्वागतकक्ष नाट्यसंमेलन पूर्वीची नाट्यसंमेलने ६९वे नाट्यसंमेलन भाग ४ - डॉ. मधू आपटे
६९वे नाट्यसंमेलन भाग ४ - डॉ. मधू आपटे पीडीएफ प्रिंट ई-मेल
नाट्य संमेलन परिसर ... सांगलीच्या राजवाडा परिसरातील पूर्वेकडील मैदानावर १०० फुट लांब ,४० फुट रुंद आणि ४५ फुट उंच असा भव्य रंगमंच उभारला आणि त्याला आद्य मराठी नाटककार विष्णुदास भावे यांना नाटक लिहिण्याची स्फूर्ती देणारे आणि सांगली संस्थानाचे पहीले अधिपती ' श्रीमंत चिंतामणराव अप्पासाहेब [ पहीले चिंतामणराव पटवर्धन ] यांचे नाव देण्यात आले .मात्र पुढील भव्य प्रेक्षाग्रह झाकलेले नव्हते. तर वर स्वच्छ आकाश होते. प्रवेशद्वाराची काळ्या रंगातील वैशिठ्य पूर्ण कनात अत्यंत आकर्षक होती, त्याची आखणी आणि सजावट मिरजेच्या प्रख्यात श्री शरद आपटे यांनी केली होती. प्रेक्षागृहात खुर्च्या आणि गलारीची व्यवस्था केली होती. २ हजार आसनांची सोय होती, शेजारच्या कन्या पुरोहित प्रशालेच्या आवारात स्वतंत्र मंडप आणि स्टेजची व्यवस्था फार उपयुक्त ठरली. शिवाय माडीवरील हॉलमध्ये विशेष कार्यकारिणीची बैठकाची व्यवस्था होती. याच इमारतीच्या मागे आठवले बाल मंदिराच्य आवारात ' भोजन; चहापाणी यांची व्यवस्था होती, हा भाग, भोजनाचा मेनू आदी विभाग सांगलीचे प्रख्यात सर्जन डॉ .प्र.गो. आपटे यांनी अत्यंत कुशलतेने सांभाळला, त्यांना 'स्वानंद केटरर' चे श्री बबनराव करंदीकर यांनी मदत केली. आलेल्या सर्व पाहुण्यांनी 'भोजनाची मुक्ता कंठाने प्रशंसा केली ... ह्या परिसराला ; ‘विष्णुदास नगरी’ असे नाव दिले होते. त्यात पत्रकारांसाठी खास टेलिफोन व्यवस्था केली होती. शिवाय बाहेर पुस्तके, खाद्य पदार्थ यांचे स्टॉल होते. सर्व कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण टी,व्ही. वरून करण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी होऊ शकला नाही, कारण त्यासाठी आवश्यक तांत्रिक सुविधा टेलिफोन खाते करू शकली नाही . मात्र 'आकाशवाणी सांगली केंद्राने ' सर्व कार्यक्रमांचे प्रसारण सातत्याने केले .