मुख्य विभाग

स्वागतकक्ष नाट्यसंमेलन पूर्वीची नाट्यसंमेलने ६९वे नाट्यसंमेलन भाग २ - डॉ. मधू आपटे
६९वे नाट्यसंमेलन भाग २ - डॉ. मधू आपटे पीडीएफ प्रिंट ई-मेल
६९ वा वे मराठी नाट्य संमेलन सांगलीला मिळाले , पण त्यात एक मेख होती. निमंत्रण जरी " अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर ' म्हणजेच ' भावे नाट्य मंदिर ' ह्या संस्थेने दिले असले तरी मध्यवर्ती परिषदेने एक अट घातली ती अशी कि ' भावे नाट्य मंदिरानं स्थानिक ‘ नाट्य परिषद शाखेला 'सह निमंत्रक आणि सह संयोजक' म्हणून बरोबर घ्यावे .. ही अट भावे नाट्य मंदिराला आवडली नाही पण शेवटी अगदी नाईलाजाने ' नाट्य परिषद, सांगली शाखेला ' संयुक्त निमंत्रक ' म्हणून भावे नाट्य मंदिराने मान्यता दिली. ही अट प्रथमच घालून अमलात आणली गेली. त्यामागे थोडा इतिहास होता. जिथे जिथे नाट्य संमेलने झाली, तिथल्या प्रभावी नाट्य संस्था गावातील अन्य नाट्य संस्थांना जाणून बुजून टाळत. त्यामुळे त्या गावी अन्य नाट्यकर्मी असंतुष्ट राहत. त्यामुळे ' मध्यवर्ती परिषदेने ही अट ' संमेलन जास्तीत जास्त समावेशक ' व्हावे या उद्देशाने घातली आणि त्याची सुरुवात ६९वा व्या सांगली नाट्य संमेलनापासून सुरु झाली आणि ते वर्तुळ आता पुन्हा ९२ वा व्या सांगली नाट्य संमेलनात पूर्ण होत आहे , आता ' सांगली नाट्य परिषद शाखेस सांगलीच्याच' चिंतामणी नगर नाट्य शाखेस सह संयोजक म्हणून स्वीकारावे लागले, ते कमी म्हणून कि काय, सहयोगी म्हणून आता संपूर्ण सांगली जिल्हा समाविष्ट करण्यात आला आहे, मात्र ही अति व्याप्ती संमेलन संयोजनास आणि शेवटी ते यशस्वी होण्यास अडचणीचे ठरू शकते. कारण त्यामुळे जिल्हा परिषद, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका याच्या माध्यमातून राजकारणी प्रभुत्व गाजवणार आणि ज्या नाट्य कर्मी साठी हे नाट्य संमेलन आयोजिले जाते त्यांचेकडे दुर्लक्ष होण्याची भीती ठळकपणे व्यक्त होत आहे