मुख्य विभाग

स्वागतकक्ष नाट्यसंमेलन सांगली नाट्यसंमेलन वार्ता मराठी रंगभूमीवर धंदेवाईकांची मक्तेदारी
मराठी रंगभूमीवर धंदेवाईकांची मक्तेदारी पीडीएफ प्रिंट ई-मेल
संदर्भ - दै. लोकमत अविनाश कोळी दि. २१ (बालगंधर्वनगरी, सांगली)

संमेलनांनी नव्वदी पार केली तरीही वर्षानुवर्षे मराठी रंगभूमीवर धंदेवाईक नाट्यप्रवाहाचीच मक्तेदारी राहिली. त्यामुळे नाटकांचे अन्य प्रमुख प्रवाह व त्यांचे रंगकर्मी झाकोळले गेले. या सर्व प्रवाहांना कवेत घेऊन संमेलने झाली असती, तर त्यातून सार्वभौम रूप साकारता आले असते, असे परखड मत ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी येथे व्यक्त केले.
९२ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. ‘आद्यनाटककार विष्णुदास भावे मुख्य व्यासपीठा’वर आज नाट्य संमेलनाचे उद्घाटन पालेकर यांच्या हस्ते झाले.


पालेकर म्हणाले, ‘पारंपरिक संगीत नाटकांचा प्रवाह, प्रायोगिक रंगभूमी, दलित रंगभूमी यांना कधीही या संमेलनांमध्ये निमंत्रित केले गेले नाही. अनेक दिग्गज नाटककार, नाट्यलेखक, समकालीन रंगकर्मी यांची दखल घ्यावीशी वाटली नाही. ही सापत्नपणाची वागणूक संमेलनांना संकुचित करीत आहे. त्यामुळे नाट्य चळवळीच्या सर्वांगीण वृद्धीसाठी नाट्य परिषदेने काहीतरी केले पाहिजे.’ नाट्य परिषदेसह सेन्सॉर बोर्ड, तथाकथित संस्कृतीरक्षक म्हणवणार्‍या संस्था, संघटनांवरही त्यांनी कडाडून टीका करत रंगकर्र्मींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.
स्वागताध्यक्ष कदम म्हणाले, ‘मराठी रंगभूमीवरील नवे प्रयोग व प्रेक्षकांमधील उदासीनता दूर करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ यासारख्या नाट्य प्रशिक्षण देणार्‍या संस्थांची निर्मिती राज्यात व्हावी.’