मुख्य विभाग

स्वागतकक्ष व्यक्ति परिचय राजकीय नेते शिक्षणप्रेमी मा. अण्णासाहेब डांगे
शिक्षणप्रेमी मा. अण्णासाहेब डांगे पीडीएफ प्रिंट ई-मेल
सांगली जिल्ह्यातील एक प्रमुख राजकीय नेते मा. अण्णासाहेब डांगे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांच्या अलौकिक कार्याविषयी विविध मान्यवरांचे लेख असणारा ‘यात्रिक’ नावाचा गौरव ग्रंथ नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. या ग्रंथात समाविष्ट केलेला अण्णासाहेब डांगे यांच्या शिक्षणविषयक कार्याचा आढावा घेणारा श्रीकांत रानडे यांनी लिहिलेला लेख.

एका विशिष्ट ध्येयवादाने प्रेरित होऊन हाल अपेष्टा, उपेक्षा, संकटे, कौटुंबिक हानी या कशाचीही तमा न बाळगता मा. अण्णासाहेबांनी संपूर्ण आयुष्य वेचले. ४२ वर्षांच्या राजकीय जीवनात दोन वर्ष वगळता सर्व काळ विरोधी पक्षात कार्य केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा विविध पक्षांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला.

सांगली जिल्हा हा स्वातंत्र्य चळवळीत अग्रक्रमावर असलेला जिल्हा होता. कॉंग्रेसचा बालेकिल्ला न्हणून तो ओळखला जाई. १९६७ पासून सांगली जिल्ह्यात जनसंघाचे कार्य करणारा सच्चा कार्यकर्ता म्हणून सर्वजण अण्णांना ओळखतात. लोकांच्या समस्या मांडण्यासाठी मोर्चे, जन आंदोलन करून त्यांनी महाराष्ट्रभर दौरे केले.

उन्हातान्हात पायी फिरून, फडक्यात बांधलेली भाकरी खाऊन अविश्रांत श्रम केले. विरोधी पक्षनेते असताना देखील प्रत्येक प्रश्नाला घणाघाती आवाजाने वाचा फोडली. राजकारणा निवृत्तीच्या काळात धनगर समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलने केली.

स्वतःचे फारसे शिक्षण झाल्ले नसतांना देखील गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेची स्थापना केली. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक महाविद्यालये सुरू करून शिक्षणाची सोय केली. सैनिक स्कूल, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविले. विविध शैक्षणिक उपक्रमांना चालना देण्याचा प्रयत्न केला. जिल्हास्तरीय, राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या आयोजनात मोठा सहभाग घेतला. प्रदर्शनातील प्रकल्पाचे बारकाईने निरीक्षण ते करीत असत.

अशा या अण्णांच्या अमृतमहोत्सवास माझ्या हार्दिक शुभेच्छा ..