मुख्य विभाग

स्वागतकक्ष नाट्यसंमेलन सांगली नाट्यसंमेलन वार्ता नाट्यसंमेलन स्थळाला "बालगंधर्व' यांचे नाव
नाट्यसंमेलन स्थळाला "बालगंधर्व' यांचे नाव पीडीएफ प्रिंट ई-मेल

सांगली (सकाळ वृत्तसेवा)- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या येथे होणाऱ्या 92 व्या नाट्यसंमेलनाच्या स्थळाला कै. नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्वनगरी असे नाव देण्यात आले आहे, ही माहिती संयोजक डॉ. दयानंद नाईक, शफी नायकवडी, विनायक केळकर, श्रीनिवास जरंडीकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले,""बाहेरगावहून येणाऱ्या कलाकार व पाहुण्यांना सांगलीचा मेवा विनामूल्य भेट दिला जाणार आहे. त्यात 100 ग्रॅम बेदाणे, गुळाची ढेप, भडंग व 200 ग्रॅम हळदीचा समावेश आहे. सतीश पटेल, माजी महापौर सुरेश पाटील, अरुण दांडेकर, शरद शहा यांनी त्यासाठी सहकार्य केले आहे. इको फ्रेंडली पेन, पॅड, कापडी पिशवीसह प्रत्येकास पुष्पगुच्छाऐवजी वृक्षसंवर्धनाचा संदेश म्हणून एक रोप दिले जाणार आहे. त्यासाठी एक हजार रोपांची सोय केली आहे.''
ते म्हणाले,""बालगंधर्वांनी हाताळलेल्या वस्तूचे प्रदर्शनही संमेलनानिमित्त होणार आहे. त्यांच्या पुण्यातील नातेवाइकांनी देऊ केलेली दुर्मीळ पोस्टर्स, सन्मानचिन्ह, अत्तर, शालू आदी साहित्याचा त्यात समावेश आहे. स्थानिक चित्रकार प्राचार्य एम. के. जाधव यांच्या चित्रांचे प्रदर्शनही संमेलनस्थळी आयोजित केले जाणार आहे. बाहेरून येणाऱ्या कलाकारांना राहण्यासाठी महापालिका क्षेत्रातील 17 लॉजमध्ये 150 खोल्यांची सोय केली आहे.''

संमेलनस्थळ परिसरातील विभागांची नावे अशी
मुख्य व्यासपीठ - आद्य नाटककार विष्णुदास भावे व्यासपीठ.
प्रवेशद्वारांची नावे - नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल, नटवर्य चित्तरंजन कोल्हटकर, नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर, नटवर्य गणपतराव मोहिते तथा मास्टर अविनाश, नटवर्य मामा पेंडसे.

व्यासपीठ 1 - नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर. प्रवेशद्वार - व्यंकटेश माडगूळकर.
व्यासपीठ 2 - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. प्रवेशद्वार - प्रा. यशवंत केळकर.
भोजनस्थळ - नाटककार दिलीप परदेशी परिसर. बुक स्टॉल - बी. एन. चौगुले परिसर. प्रदर्शन - प्रा. अरुण पाटील परिसर.
व्यासपीठ - बालगंधर्व नाट्यगृह मिरज-नटवर्य गणपतराव बोडस. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह -तमाशा कलावंत काळू-बाळू. विष्णुदास भावे नाट्यमंदिर - ऍड. मधुसूदन करमरकर.
प्रवेशद्वार - बालगंधर्व नाट्यगृह मिरज-वासुदेवशास्त्री खरे. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह-मास्टर दीनानाथ मंगेशकर. विष्णुदास भावे नाट्य मंदिर - रसिकाग्रणी अण्णासाहेब कराळे.