मुख्य विभाग

नाटय़ संमेलनाची मुहूर्तमेढ पीडीएफ प्रिंट ई-मेल
संदर्भ -दै. लोकमत २८-१२-२०११
नाटय़पंढरीत होत असलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाची मुहूर्तमेढ उद्या, गुरुवार, 29 डिसेंबररोजी रोवण्यात येत आहे. येथील नेमिनाथनगरमधील कल्पद्रुम क्रीडांगणावर संमेलननगरीचे भूमिपूजन करून तयारीला सुरुवात होत आहे.
92 व्या नाटय़ संमेलनाचे ‘काऊंट डाऊन’ सुरू झाले असून संमेलन अवघ्या 23 दिवसांवर येऊन ठेपले आहे. संमेलनाची मुहूर्तमेढ गुरुवारी रोवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता संयोजन समिती, स्थानिक नाटय़कर्मी यांच्याहस्ते भूमिपूजन Aहोणार आहे. कल्पद्रुम’वर उभारण्यात येणार्‍या संमेलन नगरीचे काम निविदा पद्धतीने दिले आहे. या ठिकाणी भव्य स्वागत कमान, मुख्य सभामंडप, मुख्य व्यासपीठ, बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. उद्यापासून त्या कामाला सुरुवात होईल.
संमेलनाचे सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवरून थेट प्रक्षेपण करण्याला वाहिनीने हिरवा कंदील दाखविला आहे. नाटय़ परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी दूरदर्शनबरोबर मंगळवारी बैठक घेतली.