मुख्य विभाग

स्वागतकक्ष नाट्यसंमेलन नाट्यक्षेत्रातील व्यक्तीपरिचय नियोजित नाट्यसंमेलन अध्यक्ष -श्रीकांत मोघे
नियोजित नाट्यसंमेलन अध्यक्ष -श्रीकांत मोघे पीडीएफ प्रिंट ई-मेल
नाट्यसंमेलन अध्यक्ष -श्रीकांत मोघे यांचा परिचय..

- जन्म : सांगलीतील किलरेस्कर वाडीचा १९४0-४१ दरम्यान शालेय स्तरावर ‘गोट्या’कर्ते ना. धो. ताम्हणकर यांच्यामुळे नाटकातील पहिली सुरुवात.
शाळेत शिकत असतानाच नाटकाची आवड निर्माण झाली. पुढे महाविद्यालयात शिकत असताना नाटकांतून अभिनय करत असताना भालबा केळकर यांच्या ‘बिचारा डायरेक्टर’ या नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले. - सांगलीतील विलिंग्डन कॉलेजमध्ये शास्त्र शाखेत प्रवेश. तेथे गॅदरिंगमध्ये ‘घराबाहेर’ नाटकाने सुरुवात. तसेच आचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ नाटकाचे प्रयोग केले.
- १९५१-५२ मध्ये पुण्यात आल्यानंतर शरद तळवलकर यांच्या हाताखाली पु. ल. देशपांडे यांचे ‘अंलमदार’ सादर केले. याला वाळवेकर ट्रॉफी मिळाली.
पुण्याच्या महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेने १९५५ साली झालेल्या राज्य शासनातर्फे आयोजित पहिल्या राज्य नाटय़ स्पर्धेत ‘अपूर्व बंगाल’ हे नाटक सादर केले. यातील प्रमुख भूमिकेसाठी श्रीकांत मोघे यांना राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले. त्यावेळी डॉ. श्रीराम लागू, विजया मेहता यांनाही पारितोषिक मिळाले होते.
- १९५६ - बीएस.सी झाल्यावर महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे राज्य नाट्य स्पर्धेसाठी मामा वरेरकर यांचे ‘अपूर्व बंगाल’ केले. त्याला पहिले पारितोषिक मिळाले.
- किर्लोस्कर ऑईल इंजिन कंपनीत नोकरी करत असतानाच नाटकात काम करण्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीत प्रवेश घेण्यासाठी ते दिल्लीला गेले. परंतु, अकादमीच्या चमूत प्रवेश मिळाला नाही. पुढे चारूदत्त नावाच्या हिंदी नाटकात त्यांनी साकारलेली छोटीशी भूमिका तत्कालीन मंत्री डॉ. बाळकृष्ण केसकर यांना खूप आवडली. १९५७ साली पहिल्या स्वातंत्र्यलढय़ाच्या शताब्दीनिमित्त आयोजित ‘और भगवान देखता रहा’ या नाटकातील श्रीकांत मोघेंच्या अभिनयाचे पंडित नेहरू, डॉ. राजेंद्रप्रसाद तसेच अनेक मंत्री यांनी त्यांचे कौतुक केले. त्याचवेळी पु. ल. देशपांडे दिल्लीत होते. त्यांनाही गायक नट हवा असल्यामुळे ‘कृष्णाकाठी कुंडल’ या नाटकात त्यांनी मोघे यांना भूमिका दिली. तिथून पु. ल. देशपांडे यांच्याशी त्यांचा परिचय झाला. मुंबईत साहित्य संघाच्या ‘तुझे आहे तुजपाशी’त त्यांनी काम केले. त्यानंतर ‘आंधळ्यांची शाळा’, ‘चौऱ्याऐंशीचा फेरा’, ‘जावयाचे बंड’, ‘साक्षीदार’ ही नाटके त्यांनी केली.
- १९६२ साली पु. ल. देशपांडे यांच्या ‘वार्‍यावरची वरात’ला सुरुवात झाली. १२ वर्षे या नाटकाचे शेकडो प्रयोग केले.‘लेकुरे उदंड झाली’ हे नाटक आणि पुलंच्या ‘वाऱ्यावरची वरात’ या बहुपात्री कार्यक्रमाने श्रीकांत मोघे यांना प्रचंड लोकप्रियता लाभली. या काळात ‘सीमेवरून परत जा’, ‘मी हरलो मी जिंकलो’, ‘गारंबीचा बापू’, ‘नवी कहाणी’, ‘गरूडझेप’, ‘बिकट वाट वहिवाट’, ‘अजून यौवनात मी’, ‘चंपा गोवेकर’ इत्यादी नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या.मृत्युंजय, बिकटवाट वहिवाट आदी साठहून अधिक नाटकात प्रमुख भूमिका. त्यांचे सात हजाराहून अधिक प्रयोग केले.
याच दरम्यान ‘प्रपंच’ चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटाला राष्ट्रपती पदक मिळाले. पुढे ‘प्रपंच’ या चित्रपटाद्वारे रूपेरी पडद्यावर पदार्पण केले आणि अनेक चित्रपटांतूनही अभिनय केला.- नंदीनी, निवृत्ती ज्ञानदेव, मधुचंद्र, शेवटचा माणूस राम, आम्ही जातो आमच्या गावा, दोन्ही घरचा पाव्हणा, मनचली, सिंहासन आदी पन्नासहून अधिक चित्रपटातून प्रमुख भूमिका केल्या.
- महाराष्ट्र शासनाचा कलागौरव पुरस्कार, शाहू छत्रपती पुरस्कार, काशिनाथ घाणेकर पुरस्कार, केशवराव दाते पुरस्कार, नानासाहेब फाटक पुरस्कार असे पुरस्कार मिळाले.