मुख्य विभाग

स्वागतकक्ष नाट्यसंमेलन सांगली नाट्यसंमेलन वार्ता राज्य नाट्य स्पर्धेवर सांगलीचे वर्चस्व
राज्य नाट्य स्पर्धेवर सांगलीचे वर्चस्व पीडीएफ प्रिंट ई-मेल

संदर्भ -सकाळ वृत्तसेवा २९-१०-२०११

सांगली - 49 व्या राज्य नाट्य स्पर्धेत सांगलीच्या नवरंग सांस्कृतिक कला मंचतर्फे झालेल्या "अजूनही उजाडत नाही' या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. सांगलीच्या सस्नेह कला क्रीडा मंडळाच्या "वंडर लॅंड' ने द्वितीय, तर सांगलीच्याच नाट्य चित्रपट कलाकार तंत्रज्ञ ट्रस्टच्या "फ्रेंडशिप' ने तृतीय क्रमांक मिळविला. ही माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक अजय आंबेकर यांनी दिली.

ते म्हणाले,""अभिनयातील पुरुषांचे रौप्यपदक नाट्य चित्रपट संस्थेच्या यशोधन गडकरीने तर महिलांचे रौप्यपदक नवरंगच्या अपर्णा गोसावी यांनी पटकावले. स्पर्धेला रसिकांचा प्रतिसाद चांगला लाभला. 13 नाट्यप्रयोग झाले. अभिनयाची प्रशस्तिपत्रके सांगलीच्याच प्राची गोडबोले (सस्नेह), रिदीता वैद्य (श्री. ए. बी. पाटील चॅरिटेबल ट्रस्ट), हरीष जाधव (रणझुंझार कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, मिरज), सचिन पारेख (नवरंग), राहुल संबोधी, मोहन देशपांडे, दीपाली कुलकर्णी, एस. एन. निकम यांनी पटकावली आहेत.

अन्य निकाल असे -
दिग्दर्शन - निर्भय विसपुते (सस्नेह कला क्रीडा मंडळ), सचिन पारेख (नवरंग सांस्कृतिक कला मंच).
नेपथ्य - दिनेश म्हैसकर (सस्नेह), जावेद पेंढारी व श्रीराम कुलकर्णी (नवरंग).
प्रकाश योजना - जी. प्रसाद (सस्नेह), दर्शन सोनाळे (नवरंग).

परीक्षक म्हणून बापू लिमये, दीप चहांदे, शशांक लावनीस यांनी काम पाहिले.