मुख्य विभाग

स्वागतकक्ष नाट्यसंमेलन सांगली नाट्यसंमेलन वार्ता संमेलनापासून नाटककार राजकारण्यांमुळे दूर
संमेलनापासून नाटककार राजकारण्यांमुळे दूर पीडीएफ प्रिंट ई-मेल

संदर्भ -जयसिंग कुंभार - सकाळ वृत्तसेवा ५-११-२०११

सांगली - आजची नाट्यसंमेलने निखळ राहिलेली नाहीत. राजकारण्यांचा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळेच नाटककार आणि कलावंतांचा सहभाग कमी होत चालला आहे, असे मत ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी व्यक्त केले. शनिवारी मतकरी यांना विष्णुदास भावे सुवर्ण पदकाने गौरवण्यात येत आहे. त्यानिमित्ताने ते सांगलीत आले असता "सकाळ'शी बोलत होते.

नाट्यसंमेलन आणि संमेलनाध्यक्ष पदाकडे मोठे कलावंत, नाटककार फिरकत नाहीत, असे अलीकडच्या काळातील चित्र आहे, या प्रश्‍नावर मतकरी म्हणाले, 'राजकारण्यांचा हस्तक्षेप मोठा असतो. त्यांनी दिलेल्या पैशातून मिंधेपण येत असते. साहजिकच त्यांच्याकडून संमेलनाचा वापर होतो. या साऱ्या गोंधळात शिरायची तयारी सर्वांचीच असत नाही. त्यामुळे नाट्यसंमेलनातील सहभाग असो किंवा नाट्यसंमेलनाध्यक्षाची निवडणूक, याला प्रतिसाद मिळत नाही. सरकारने पैसा दिला म्हणजे तिथे राजकारणी हवेतच असे नाही. रसिक म्हणूनच त्यांची उपस्थिती हवी. दुर्दैवाने ती प्रगल्भता राजकारणी आणि नाट्यक्षेत्रातील मंडळींकडे नाही.''

वैचारिक आणि आशयसंपन्न नाटके कमी झाली आहेत, या प्रश्‍नावर ते म्हणाले, ""माध्यमांची गर्दी अभिरुची बिघडवते. वाचनाची गरज कमी होतेय. परिणामी कोणत्याही कलाकृतीमागे आवश्‍यक असणारे प्रदीर्घ विचार-चिंतन कमी होतेय. साहजिकच विचार थोडा आणि लेखन जास्त असा प्रकार सभोवती होताना दिसतोय.''