मुख्य विभाग

स्वागतकक्ष नाट्यसंमेलन सांगली नाट्यसंमेलन वार्ता नाट्य संमेलनाच्या संयोजनाची जबाबदारी
नाट्य संमेलनाच्या संयोजनाची जबाबदारी पीडीएफ प्रिंट ई-मेल

सांगली येथे होणाऱ्या 92 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या संयोजनाची जबाबदारी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सांगली व चिंतामणीनगर यांच्याकडे दिल्याची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष हेमंत टकले यांनी आज दिली.

ते म्हणाले, 'या दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर या आठवड्यात मुंबईत पहिली बैठक होईल. या बैठकीत संमेलनाचे नियोजन, कार्यक्रमाची रूपरेषा ठरविली जाणार आहे. मुंबईतील या बैठकीनंतर सांगलीत संमेलनाची तयारी व जबाबदारी देण्याच्या अनुषंगाने बैठक होणार आहे. यामध्ये नाट्य परिषदेच्या राज्यातील शाखांसह स्थानिक नाट्यसंस्थांच्या सहभागाचाही विचार केला जाणार आहे.''
नियोजन समितीच्या अध्यक्षपदी विनय आपटे यांची नेमणूक झाली आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सांगली शाखाध्यक्ष डॉ. दयानंद नाईक म्हणाले, "" 22 वर्षांतर सांगलीत होणारे साहित्य संमेलन यशस्वी करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नाट्य संस्था, कलाकार, सेवाभावी संस्था यांनाही विश्‍वासात घेतले जाईल. ज्याप्रमाणे 1943 व 1988 मध्ये सांगलीत झालेल्या नाट्य संमेलनाच्या आठवणी आजही ताज्या आहेत. त्याचप्रमाणे यावेळी होणारे संमेलन रसिकांच्या स्मरणात चिरंतन राहील असेच नियोजन केले जाईल.''

चिंतामणीनगर शाखाध्यक्ष शफी नायकवडी म्हणाले, ""बऱ्याच वर्षांनंतर सांगलीत संमेलन होणार व त्याची जबाबदारीही मिळणार. ही बाब नाट्य परिषदेचे अध्यक्ष हेमंत टकले यांच्याकडून कळल्यानंतर मनस्वी आनंद झाला. संमेलनामुळे पुन्हा नव्या दमाने नाट्यपंढरीतील नाट्य चळवळीला गतिमानता मिळेल अशी खात्री वाटते.