मुख्य विभाग

स्वागतकक्ष नाट्यसंमेलन सांगली नाट्यसंमेलन वार्ता ९२ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
९२ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पीडीएफ प्रिंट ई-मेल

९२ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन या वेळी नाट्य पंढरी सांगली येथे २१, आणि २२ जानेवारी रोजी साजरे होणार आहे, हे नाट्य संमेलन अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीत विविध प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. परंतु शेवटी सांगली मध्ये नाट्य संमेलन घेण्याचे निश्चित करण्यात आले. सांगलीत संमेलन घेण्यासाठी खासदार प्रतिक पाटील यांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. सांगलीत यापूर्वी १९२४ साली बाबासाहेब घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली त्याचप्रमाणे १९४३ या वर्षी ना. वी. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यानंतर १९८८ मध्ये ज्येष्ठ नाट्य कलावंत / निर्माते राजाराम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नाट्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले होते