मुख्य विभाग

स्वागतकक्ष आपली सांगली कृष्णा नदी महापूर
कृष्णा नदी महापूर पीडीएफ प्रिंट ई-मेल

संकलन - श्री. सु. बि. कुलकर्णी, मा. ब. जाधव आणि डॉ. सु. वि. रानडे, महापूर अभ्यास समिती
निवृत्त अभियंता मंडळ, सांगली

कृष्णा नदीला दरवर्षी पूर येतो आणि कांही प्रमाणात नदी स्वच्छ होण्याच्या दृष्टीने पूर यावयास पाहिजे. तथापि २००५-२००६ सालापासून सांगली शहर व परिसरासाठी पुराचे हे स्वरूप बदलले आहे. पावसाचे प्रमाण थोडे फार वाढले तरी पुराचे पाणी नागरी भागात शिरण्याचे प्रमाण तसेच सुरक्षित पाणी पातळी ५४० मी. चे वर पुराचे पाणी येण्याचे प्रमाण वाढले आहे. या पुराचे वैशिष्ट्य म्हणजे ही पूरपातळी १० दिवसांपर्यंत टिकून राहते. इतके दिवस नागरी भागात पाणी राहिल्याने इमारती धोकादायक बनतात. चीज वस्तूंचे नुकसान होते. जनावरे दगावतात, रोगराई पसरते व मानवी जीवनावर याचा विपरित परिणाम होतो. सांगली जिल्ह्यात २००५ सालीच्या पुरांत रू. ५१.२६ कोटी शासनातर्फे मदत म्हणून वाटले गेले तर सन २००६ मधील पूरपरिस्थितीमुळे रू. २९.०० कोटी मदत शासनातर्फे वाटली गेली. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नुकसानीचा अंदाज प्रत्यक्ष वाटलेल्या मदतीपेक्षा कितीतरी जादा आहे.

कृष्णा नदीला कराडजवळ कोयना, सांगली ( हरिपूर)जवळ वारणा व नृसिंहवाडीजवळ पंचगंगा या मोठ्या नद्या मिळतात. त्यामळे सांगलीजवळ कृष्णा नदीला येणार्‍या पाण्यामध्ये कोयना व कृष्णेच्या उपनद्या यांचे पाणी असते. तसेच हे येणारे पाणी साठविण्यासाठी कोयना, वारणा, धोम, बलकवडी ही मोठी धरणे तसेच अनेक मध्यम पाटबंधारे प्रकल्प व लघु पाटबंधारे प्रकल्प बांधण्यात आले आहेत. पावसाळयांत धरणाच्या सांडव्यातून सोडावयाच्या पाण्याच्या नियंत्रणाची सोय फक्त मोठ्या धरणाच्या सांडव्यावरील वक्रद्वाराद्वारेच केली जाते. अर्थात् त्याठिकाणी विसर्गही मोठ्या प्रमाणात असतो. धरणांच्या सांडव्यातून येणारे पाणी आणि धरणांपासून सांगलीपर्यंतच्या पाणूलोटक्षेत्रात पडणार्‍या पावसाचे पाणी असे एकत्रित सांगली परिसरात येते व पूर येतो. मध्यम प्रकल्प व लघुपाटबंधारे प्रकल्प यांचा पावसाळयातील विसर्ग तसा पुराच्या दृष्टीने कमी असल्याने त्याचा म्हणावा तसा परिणाम जाणवत नाही.

सांगली जिल्ह्यातून पुढे गेल्यानंतर नृसिंहवाडीजवळ पंचगंगा नदी कृष्णा नदीला मिळते. कृष्णा नदीला पूर असेल आणि त्याचवेळी पंचगंगेला पूर असेल तर पुराची तीव्रता वाढते. पंचगंगा कृष्णा नदीला जवळजवळ काटकोनांत मिळते. त्यामुळे कृष्णा नदीला फुगवटा येतो. आणि त्याचा फटका कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्याला बसतो. नृसिंहवाडीहून पुढे कृष्णा नदी कर्नाटकात जाते.

कर्नाटकांत हिप्परगी बराज ( छोटा बंधारा) व नंतर अलमट्टी धरण आहे. अलमट्टी धरण पूर्ण झाल्यापासून म्हणजे २००५ पासून तेथे ५१९.०० मी. या पातळीला पाणीसाठा करणेस सुरुवात झाली आहे.. हिप्परगीबराजमध्ये ५२४ मी. या पातळीपर्यंत पाणी साठवले जाते.अलमट्टी धरण ते हिप्परगी बंधारा हे अंतर नदी प्रवाहाने १२५ कि. मी. आहे. अलमट्टी येथे ५१९.६० मी. पातळी असेल तर पाण्याचा विसर्ग चालू ठेवण्यासाठी नदीची वळणावळणाची १२५ कि. मी.लांबी व पुरामुळे पसरट झालेले पात्र गृहीत धरून हिप्परगी येथे ५२४ मी. पेक्षा जास्त पातळी आवश्यक आहे. शिवाय या प्रवाहाला मधे मधे असणारे बंधारे अडथळा करतात. हिप्परगी ते सांगलीचा आयर्विन ब्रिज हे अंतर १४० कि. मी. आहे. यानंतर उलट्या दिशेने हिप्परगीनंतर महाराष्ट्रात राजापूर बंधारा, म्हैसाळ बंधारा, नरसोबावाडी (पंचगंगा संगम) ते अंकली पूल (सांगली-कोल्हापूर रस्ता) ते हरिपूर (वारणा संगम) ते सांगली अशी ठिकाणे येतात.

अंकली पुलाजवळ नदीतळ पातळी ५२४ मी. आहे. पुराचे पाणी वहात असताना असे आढळून आले की अलमट्टी येथे पाणी पातळी ५१७.६० मी. असेल तर राजापूर येथे ५१५.०३ मी. व सांगली येथे ५४२.६३ पातळी होती व सांगली पुलाखालून १,७५,००० क्युसेक्स विसर्ग चालू होता. याचाच अर्थ असा की मोठा पूर असेल तर हे पाणी वाहते ठेवण्यासाठी पाणी स्वत: २५ मीटरचा फुगवटा (फरक) निर्माण करते. त्यामुळे साधारण प्रवाह चालू नसला तरी जर अलमट्टीला असलेल्या तलांकापेक्षा सांगलीतील तलांक बराच जास्त असणार. जर अलमट्टीला ५२३ मी. तलाक असेल आणि पाणी वाहते असेल तर पाण्याचा विसर्ग जसा असेल त्याप्रमारे सांगलीतील पाण्याची पातळी वाढेल.

२००४ पूर्वी राजाराम बंधार्‍या तून कर्नाटकात पाणी सोडावे यासाठी आंदोलने, पोलिस बंदोबस्त यांची जरूरी होती. पण नंतर मात्र ही आंदोलने बंद झाली कारण अलमट्टी आणि हिप्परगी धरणामुळे आलेल्या बॅकवाटरमुळे याची गरज संपली. राजापूर बंधारा मार्च २००७ मध्ये सुद्धा पूर्ण भरलेला राहिला आणि ५२४ मी. पेक्षा जास्त पाणी पातळीमुळे बुडलेला राहिला.

कर्नाटकांत हिप्परगी बराज ( छोटा बंधारा) व नंतर अलमट्टी धरण आहे. अलमट्टी धरण पूर्ण झाल्यापासून म्हणजे २००५ पासून तेथे ५१९.०० मी. या पातळीला पाणीसाठा करणेस सुरुवात झाली आहे.. हिप्परगीबराजमध्ये ५२४ मी. या पातळीपर्यंत पाणी साठवले जाते.अलमट्टी धरण ते हिप्परगी बंधारा हे अंतर नदी प्रवाहाने १२५ कि. मी. आहे. अलमट्टी येथे ५१९.६० मी. पातळी असेल तर पाण्याचा विसर्ग चालू ठेवण्यासाठी नदीची वळणावळणाची १२५ कि. मी.लांबी व पुरामुळे पसरट झालेले पात्र गृहीत धरून हिप्परगी येथे ५२४ मी. पेक्षा जास्त पातळी आवश्यक आहे. शिवाय या प्रवाहाला मधे मधे असणारे बंधारे अडथळा करतात. हिप्परगी ते सांगलीचा आयर्विन ब्रिज हे अंतर १४० कि. मी. आहे. यानंतर उलट्या दिशेने हिप्परगीनंतर महाराष्ट्रात राजापूर बंधारा, म्हैसाळ बंधारा, नरसोबावाडी (पंचगंगा संगम) ते अंकली पूल (सांगली-कोल्हापूर रस्ता) ते हरिपूर (वारणा संगम) ते सांगली अशी ठिकाणे येतात.


अंकली पुलाजवळ नदीतळ पातळी ५२४ मी. आहे. पुराचे पाणी वहात असताना असे आढळून आले की अलमट्टी येथे पाणी पातळी ५१७.६० मी. असेल तर राजापूर येथे ५१५.०३ मी. व सांगली येथे ५४२.६३ पातळी होती व सांगली पुलाखालून १,७५,००० क्युसेक्स विसर्ग चालू होता. याचाच अर्थ असा की मोठा पूर असेल तर हे पाणी वाहते ठेवण्यासाठी पाणी स्वत: २५ मीटरचा फुगवटा (फरक) निर्माण करते. त्यामुळे साधारण प्रवाह चालू नसला तरी जर अलमट्टीला असलेल्या तलांकापेक्षा सांगलीतील तलांक बराच जास्त असणार. जर अलमट्टीला ५२३ मी. तलाक असेल आणि पाणी वाहते असेल तर पाण्याचा विसर्ग जसा असेल त्याप्रमारे सांगलीतील पाण्याची पातळी वाढेल.२००४ पूर्वी राजाराम बंधार्‍या तून कर्नाटकात पाणी सोडावे यासाठी आंदोलने, पोलिस बंदोबस्त यांची जरूरी होती. पण नंतर मात्र ही आंदोलने बंद झाली कारण अलमट्टी आणि हिप्परगी धरणामुळे आलेल्या बॅकवाटरमुळे याची गरज संपली. राजापूर बंधारा मार्च २००७ मध्ये सुद्धा पूर्ण भरलेला राहिला आणि ५२४ मी. पेक्षा जास्त पाणी पातळीमुळे बुडलेला राहिला.


१) त्यामुळे दर वर्षी पूर आला की प्रथम अलमट्टी धरण ५०९.२० मीटर पातळीपर्यंत भरेल व गेट टाकल्यावर पाणी मागे सरत सरत येईल व पाणी पातळी वाढत जाईल. अलमट्टी धररापासून नदीमार्गाने अंकली पुलापर्यंतचे अंतर अंदाजे २०० कि. मी. इतके आहे. यानंतर येणार्‍या पुराच्या पाण्याला इतक्या अंतरावर विसर्ग निर्माण करण्यासाठी आपोआपच पाणीपातळी वाढेल.
२) इतक्या अंतरावर म्हणजे अलमट्टी धरण ते अंकली पूल २०० त्रक. मी. खाली जे पाणी असेल ते स्थिर असल्याने त्याठिकाणी पुरामुळे वाहून आलेला गाळ साठणेस सुरुवात होईल. नदीचे पात्र उथळ होईल व पुराची तीव्रता व पसारा वाढेल.
३) धरणामध्ये साधारणपणे ७० ते १०० वर्षांत गाळ पूर्ण भरेल असे अपेक्षित असते. म्हणजेच सांगलीच्या खाली असलेल्या धरणाच्या गाळामुळे पूर पातळी वाढण्यात गाळाचा सहभाग असेल व परिणामी सांगलीला दर वर्षी धोका निर्माण होईल. साधारणपणे २० ते २५ वर्षांतर याचे जाचक परिणाम जाणवतील आणि धरणाच्या मागील पाणीसाठ्यांत (बॅक वॉटर) असलेले सांगली हे एकमेव ऐतिहासिक मोठे शहर असेल.


४) गाळाच्या वाढीने पात्र उथळ होते आणि त्यानंतर नदीचे पात्र दिशा बदलण्यास सुरुवात करते. उत्तर भारतातील गंगा नदी व आसाममधील ब्रह्मपुत्रा नदी ही उदाहरणे आपल्यासमोर आहेत.