मुख्य विभाग

चिरस्थायी संमेलन पीडीएफ प्रिंट ई-मेल
सांगली येथे भरलेले ८१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिनांक १८ ते २१ जानेवारी २००८ या काळात संपन्न झाले. संमेलनाची भव्यता, मा. राष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन, विविध प्रदर्शने, संमेलन पहाण्यासाठी उसळलेली अलोट गर्दी अशा अनेक बाबतीत हे संमेलन पूर्वीच्या संमेलनांपेक्षा आगळे वेगळे व विक्रमी ठरले. मात्र या संमेलनातील विचारमंथन, सर्व कार्यक्रम व प्रदर्शनांचा लाभ मराठी बांधवांना सदासर्वकाळ घेता यावा यासाठी हे संकेतस्थळ म्हणजे साहित्यसंमेलनाचे चिरस्थायी स्मारक व साहित्यक्षेत्रातील एक दीपस्तंभ ठरावे अशी ज्ञानदीपची धारणा आहे व त्यासाठी संमेलनासंबंधी सर्व उपलब्ध माहिती मायसांगली या वेबसाईटवर पुनर्प्रकाशित करण्यात येत आहे.