मुख्य विभाग

स्वागतकक्ष आपली सांगली इतिहास इ. स. १८०१ ते इ. स. १९००
इतिहास इ. स. १८०१ ते इ. स. १९०० पीडीएफ प्रिंट ई-मेल
'
सांगलीचा इतिहास इ. स. १८०१ ते इ. स. १९००
१८०१ सांगली हे राजधानीचे गांव झाले. म्हणजेच श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब सांगलीस आले. गणेशदुर्गाच्या बांधकामास प्रारंभ केला.
१८०६ सांगलीच्या श्रीगणपती मंदिराची आखणी झाली.
१८०७ सांगलीच्या पेठांची आखणी व वसाहतीला प्रारंभ झाला.

 

१८०८ पटवर्धनांतील वाटण्या पूर्ण झाल्या व सांगली हे जहागिरीचे गांव निश्चित झाले.
१८११ गणेशदुर्गाचे काम पूर्ण झाले.
१८१८ इंग्रजांनी पेशव्यांचे राज्य घेतले व सर्व सरदारांना व जहागीरदारांना नोकरी करण्याचा हुकूम केला.

 

१८२० 'मी इंग्रजांची नोकरी करणार नाही' असे सांगून पहिले चिंतामणराव पटवर्धन यांनी १ लक्ष ३८ हजार ९९५ रुपयांचा मुलूख इंग्रजांस तोडून दिला. त्यात हुबळी, तडस, बरडोल, बामनगट्टे हे परगणे व गोपन गोपची सरदेशमुखी व शहापूर तालुका असा मुलुख दिला हा करार ईस्ट इंडिया कंपनीशी बेळगांव येथे झाला.

 

१८२१ सांगली शिळा प्रेस छापखान्याची स्थापना.
१८३४ सांगलीत टांकसाळ सुरु करुन नाणी पाडण्यात येऊ लागली.

 

१८३८ धुंडीराव चिंतामणराव पटवर्धन यांचा जन्म.
१८४२ दिवाणी व फौजदारी अधिकार असलेल्या न्यायाधिशांची सांगलीत नेमणूक झाली. पण यावेळी कायदेकानून अस्तित्वात नव्हते. जुन्या वहिवाटीवरुन न्यायदान होत असे.

 

१८४३ विष्णुदास भावे यांनी सांगलीस मराठी रंगभूमीस प्रारंभ केला.

 

१८४४ चैत्र शुध्द दशमीला सांगलीच्या श्रीगणपतीची प्रतिष्ठापना केली.

 

१८४६-१८५० मिरज मळा, गणपती मळा, तात्यासाहेब मळा, उपळावी व खरशिंग येथील आंब्याच्या बागा लावल्या. सांगलीत आमराई तयार केली.
१८५० हरीपूर हे गांव बुधगांवकर पटवर्धनांकडे गेले.
१८५१ मुन्सफ न्यायालये प्रथम स्थापन झाली. याच साली पहिले चिंतामणराव आप्पासाहेब हे सांगली मुक्कामी निधन पावले.

 

१८५३ कृष्णा नदीस महापूर आला.
१८५५ सांगलीत पहिला सरकारी दवाखाना निघाला.
१८६० मोठा दुष्काळ पडला.
१८६१ सांगलीत सार्वजनिक शिक्षणास प्रारंभ झाला.
१८६३ मराठी शाळा व वाचनालय याची सुरुवात.
१८६४ सांगली शहर सफाई कचेरी स्थापन.
१८६५ सांगलीत पहिली इंग्रजी शाळा व व्याकरण शाळा निघाली.

 

१८६५ वेदशास्त्र शाळेची स्थापना. या वेदशास्त्र विद्यालयात १) ऋग्वेद २) यजुर्वेद ३) न्याय ४) व्याकरण ५) ज्योतिष हे शिक्षण देणार्‍या ५ पाठशाळा काढण्यात आल्या.

 

१८६८ सांगली नगर वाचनालयाची स्थापना.
१८७२ सांगली शहराचा पहिला सिटी सर्व्हे झाला तसेच याच साली अपील कोर्ट नेमण्यात आले.

 

१८७६ अडमिनिस्ट्रेटर मेजर वेस्ट यांनी सांगली म्युनिसिपालिटी स्थापन केल्याचे जाहिर केले, याच सालात ट्रेझरी ऑफिसर नेमण्यात आला. यापूर्वी पथक फडणीस संस्थानचा हिशोब पहात होता.

 

१८७७ मोठा दुष्काळ पडला.
१८७८ दुष्काळामुळे शाळा ओस पडल्या.
१८८४ गणेशदुर्गमध्ये दगडी कमान बांधली.
१८८७ लॉर्ड रीसाहेबांची सांगलीस भेट.
१८८७ पुणे मिरज रेल्वे फाटा आला. याच साली काकडवाडीहून 'सायफन' पध्दतीने सांगली शहरास स्वच्छ पाणी पुरवठा सुरु झाला.

 

१८८९ सांगली म्युनिसिपालिटीने आगीचा पहिला बंब खरेदी केला.

 

१८९१ सांगली शहराची लोकसंख्या तेरा हजार झाली याच साली मिरज - कोल्हापूर रेल्वे लाईन सुरु झाली व पोस्ट ऑफिस सुरु झाले.

 

१८९२ हायस्कूलला ड्राईंग क्लास जोडला.
१८९३ सांगली स्टेट बँक सुरु झाली.
१८९५ हायस्कूलला स्कूल फायनल क्लास जोडला.
१८९८ सांगलीत पहिली प्लेगची साथ आली. २ हजार १५९ माणसे मयत झाली.