मुख्य विभाग

स्वागतकक्ष आपली सांगली कुपवाड इतिहास
कुपवाड इतिहास पीडीएफ प्रिंट ई-मेल

सांगली व मिरज संस्थानांच्या मध्ये असणारा सहा हजाराहून अधिक एकराचा ओसाड माळरानाचा हा भाग पूर्वी ब्रिटिश सरकारच्या हद्दीत होता. गावाला नदीचे सानिध्य नाही. कोणतीही पाणी योजना नाही. यामुळे सगळा भूभाग ओसाड. गावात ’लाडले माशाय’ नावाचा एक प्रसिद्ध दर्गा. तिथे दरवर्षी मोठा उरूस भरायचा. सांगली- मिरज संस्थानी पोलिसांची हुकुमत येथे चालत नसल्याने स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश विरोधी हालचाली करण्यास हा भाग सोयीचा होता. त्यामुळे कुपवाड भाग क्रांतीकारकांच्या चळवळीसाठी वरदान ठरला. धोंडीराम माळी, आर. पी. पाटील, दादा जिनगोंडा आदी कुपवाडकर मंडळीनी मोठे क्रांतीकार्य केले.
शेतीसाठी सोयी नसल्याने कुपवाडकर मंडळीनी आपल्या जमिनी फार अल्प मोबदल्यात विकल्या. त्याचमुळे विलिग्डन कॉलेज, वालचंद कॉलेज, साखर कारखाना इत्यादी उभे राहिले. वसंतदादांच्या प्रयत्नामुळे औद्योगिक वसाहत उभी राहिल्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणावर कारखान्यांची उभारणी झाली. १३६ हून अदिक हौसिंग सोसायट्या उभ्या राहिल्या. आता महापालिका क्षेत्रात आल्यानंतर या भागातील घरफाळ्याचे दर वाढले. सुधारणाही होऊ लागल्या.