मुख्य विभाग

मा.पृथ्वीराज देशमुख पीडीएफ प्रिंट ई-मेल

मा.पृथ्वीराज देशमुख हे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांचे चुलते, लोकनेते संपतराव देशमुख यांचा वैचारिक व सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकीत विकासाचे रचनात्मक कार्य उभे करण्याची संधी त्यांना मिळाली.लोक त्यांना आपुलकीने पृथ्वीराजबाबा असे म्हणतात. पृथ्वीराज देशमुख यांनी १९९६ साली विधानसभा निवडणूक लढवली. त्यामध्ये येथील जनतेने त्यांना विजयी करून विधानसभेत पाठविले.

त्यांनी डोंगराई सूतगिरणीची उभारणी केली.आपल्या विधायक कार्यातून सहकार व राजकारणात त्यांनी स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. त्यांनी मतदारसंघातील विकासाच्या कामांना महत्व देऊन रेंगाळलेली अनेक कामे मार्गी लावली. टेंभू योजना पूर्णत्वासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला. शेतकर्‍याच्या उन्नतीसाठी त्यांनी केन अ‍ॅग्रो कारखाना, डोंगराई व महालक्ष्मी मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी, दूधसंघ, शैक्षणिक संस्था व लघुद्योग उभारून हातभार लावला. त्यांनी मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना काम दिले. सन १९९९ ला पृथ्वीराज देशमुख यांनी सर्व कार्यकर्त्यासह शरद पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचे ठरवले आणि राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला. कामाच्या पूर्णत्वासाठी मनापासून त्याची असणारी धडपड व राजकारणात वेगळे काहीतरी करून दाखविण्याची त्यांची जिद्द, या सर्व गोष्टी शरद पवार यांच्या लक्षात आल्यानतंर त्यांनी पृथ्वीराजबांबाना राष्ट्रीय सहकार विकास निगम नवी दिल्ली (एन.सी.डी.सी) या संस्थेचे संचालक पद देऊन गौरव केला. या संधीचा लाभ घेत त्यांनी विविध योजनांसाठी मोठया प्रमाणात निधी आणला.

सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव विभागाचा विकास करण्यात त्यांनी महत्वाचे योगदान दिले आहे.