मुख्य विभाग

स्वागतकक्ष संस्था परिचय महाविद्यालये वसंतदादा अभियांत्रिकी महाविद्यालय
वसंतदादा अभियांत्रिकी महाविद्यालय पीडीएफ प्रिंट ई-मेल
खेडयापाडयांत तंत्र व वैद्यकीय शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी विनाअनुदानित महाविद्यालयांना परवानगी देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेणार्‍या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नावाने बुधगाव येथे १९८३ म्ध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन झाले. शेतकर्‍याच्या मुलांनाही डॉक्टर-इंजइनिअर होण्याची स्ण्धी मिळावी, असा हेतू यामागे होता. वालचंद महाविद्यालयाच्या सहकार्याने बुधगावच्या या महाविद्यालयाची वाटचाल सुरू झाली. सध्या अभियांत्रिकीच्या सात शाखांचे शिक्षण येथे दिले जाते. ३२ एकर जागेत सुसज्ज इमारतीसह प्रयोग शाळा, ग्रंथालय,वसतिगृहे, क्रीडागण अशा सुविधा आहेत. पदवीसाठी निर्मिती व पदविकासाठी ’प्रोबो’या राष्ट्रीय स्तरारील स्पर्धाचे संपूर्ण आयोजन केले जाते, यामध्ये देशभरातील महाविद्यालये सहभागी होतात.या स्पर्धाचे संपूर्ण नियोजन विद्यार्थीच करतात. गेल्या वर्षी २८० विद्यार्थी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवडले गेले. नियोजन मंडळाच्या धोरणानुसार तांत्रिक मनुष्यबळ वाढविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारे नवनवीन शैक्षणिक उपक्रम व इतर व्यवसायिक अभ्यसक्रम सुरू कण्यासाठी परवानगी देत आहेत.यानुसारच इंटिग्रेटेड कॅम्पसमध्ये भविष्यकाळात संस्थेच्या वतीने एम,बी,ए,एम.सी.ए व इतर अभीयांत्रिकी अभ्यासक्रम सुरू होण्याची चिन्हे आहेत.