मुख्य विभाग

भारती विद्यापीठ पीडीएफ प्रिंट ई-मेल
सांगली-मिरज रस्त्यावर भारती विद्यापीठाने सुमारे शंभर कोटी रुपये खर्च करून उभारलेले वैद्यकीय महाविद्यालय संकुल आता पूर्णत्वास आले आहे. एमबीबीएस, डेंटल आणि नर्सिग पदवी शिक्षणाची सोय असलेले हे संकुल भारती विद्यापीठाची गरुडभरारी दर्शविणारे आहे. सांगलीवाडी येथे पतंगराव कदम कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कडेगाव येथे श्रीमती बायाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय,सांगलीत राजवाडा चौकातील भारती विद्यापीठ भवनातील विधी व शास्त्र महाविद्यालय, पलूस येथे तंत्रनिकेतन, हिंगणगाव येथे मोहनराव कदम कृषी महाविद्यालय, कडेगाव येथे मुलीसाठी आयटीसंस्था अशा भारती परिवारातील प्रमुख शैक्षणिक संस्था आहेत. भारती विद्यापीठाचे संस्थापक, कुलपती पतंगराव कदम यांनी आधी पुण्यात संस्थेची शाळा सुरू केली.गेल्या पंचवीस वर्षात सांगली जिल्ह्यातही भारती विद्यापीठाचा शाखाविस्तार झाला आहे.