मुख्य विभाग

स्वागतकक्ष संस्था परिचय शिक्षणसंस्था लठ्ठे एज्युकेशन सोसायटी
लठ्ठे एज्युकेशन सोसायटी पीडीएफ प्रिंट ई-मेल
सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटक सीमा भागातील ’लठ्ठे एज्युकेशन सोसायटी’च्या विविध महाविद्यालयांत सुमारे पंचवीस हजार विद्यार्थी अध्यापन करतात. मुंबई प्रांताचे पहिले अर्थमंत्री, तसेच छत्रपती शाहू महारांजाचे विद्याधिकारी अण्णासाहेब लठ्ठे यांच्या कार्याचे स्मारक म्हणून दक्षिण भारत जैन सभेने व धुरिणांनी या संस्थेची स्थापना केली. बालवाडीपासून सर्व पारंपारिक विद्याशाखा, संगणक, माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान अशा विद्याशाखांचे अभ्यासक्रम शिकविले जातात. सांगलीत या संस्थेच्या कस्तुरबा वालचंद महाविद्यालय, एन.एस.सोटी विधी महाविद्यालय, सांगली हायस्कूल, गणपतराव आरवाडे वाणिज्य महाविद्यालय, एन.डी.पाटील रात्र महाविद्यालय, राजमती कन्या महाविद्यालय असा मोठा शाखाविस्तार आहे. स्वच्छ शैक्षणिक परिसर, प्रशस्त इमारती, अभ्यासिका, आधुनिक सुविधांनी सुसज्ज प्रयोगशाळा अशी संस्थेच्या महाविद्यालयांची ओळख आहे.भाषा प्रयोगशाळेसह सर्व विद्याशाखांना संगणकशिक्षण निवार्य करण्याचा निर्णय लठ्ठे एज्युकेशन सोसायटीने घेतल्याची माहिती सचिव अ‍ॅड.व्ही.टी चौगुले यांनी दिली.