मुख्य विभाग

स्वागतकक्ष पर्यटन प्रेक्षणीय स्थळे नांद्रयाचा प्रसिध्द दर्गा
नांद्रयाचा प्रसिध्द दर्गा पीडीएफ प्रिंट ई-मेल

मिरज तालुक्यातील नांद्रे येथे प्रसिध्द ख्वॉजा कबीरली दर्गा राज्यात प्रसिध्द आहे.ख्वॉजा कबीर बंधू अरबस्तानातून गुलबर्गा, कुडची मिरज मार्गे येथे दाखल झाले.पूर्वी नांद्रयाचे नाव ’नंदगाव’ असे होते.तेथे वनराजा राज्य करीत होता. तो हुशार जादूगार होता.अशी आख्यायिका आहे.तो जादूसाठी माणसाचे बळी घ्यायचा त्याचा पाडाव करण्यासाठी हे दोन बंधू नंदगाव येथे आले.ते बाहेर निवडूंगाच्या फडात राहू लागले वनराजाचा राजवाडा ख्वॉजाने उदध्वस्त केला. त्यानंतर भक्तांचा संपर्क वाढू लागला. कालांतराने दोन्ही बांधवाचे निधन झाले.चिंतामणराव पटवर्धन मिरजेत ऊरसा निमित्त आले असताना भाविकांनी नांद्रयातील गलेफाचा मान घेण्याविषयी विनंती केली. त्यावेळी त्यांनी गलेफ चढवला
सांगली सरकारने ही पंरपरा १७० वर्षापासून आजअखेर जोपासली आहे.या आस्थेपोटी पटवर्धन सरकार जुन्या काळात हत्ती, घोडा, उंट लवाजम्यासह दहा दिवस मुक्काम ठोकत असत. या पटवर्धन सरकारांमुळेच या धार्मिक स्थळास ऊजिर्तावस्था राहिली.त्यानंतर १९६० पासून उरूस मोठया प्रमाणात होऊ लागला.