मुख्य विभाग

स्वागतकक्ष पर्यटन मंदिरे बिरोबा धनगर समाजाचे दैवत
बिरोबा धनगर समाजाचे दैवत पीडीएफ प्रिंट ई-मेल

कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी गाव म्हटले,की डोळ्यांपुढे  उभे राहते बिरोबा देवस्थान.बिरोबा हे धनगर समाजाचे आराध्य दैवत मानले जाते.बिरोवा दैवत लिगायत आहे. ब्रम्हा,विष्णू,महेश या मूर्ती बिरोबा मंदिरात आहेत,कर्नाटकातूनच हे देव डोंगरावर आले.या डोंगरावरूनच देव भक्ताच्या दर्शनासाठी आरेवाडीच्या बनात आले. यात्रेच्या पहिल्या दिवशी गोडाचा नैवेद्य देवाला दाखवला जातो.बिरोबाच्या उजव्याबाजूला बिरोबाचा भक्त सुर्‍याबा याचे मंदिर आहे.त्याच्या पलीकडे मायाक्कादेवीचे मंदिर आहे.

यात्रेला येणारा धनगर समाज यात्रेच्या तिसर्‍या दिवशी बकरीचा बळी देतात. ही बकरी बिरोबाला बळी दिली जात नाहीत व नैवेद्यहि दाखवला जात नाही.धनगर समाज मेंढपाळ व्यवसाय करणारा असल्याने यात्रे निमित्त आलेला असतो.तो मांसाहारी जेवणासाठी बळी देतो. नैवेद्य बिरोबाला नव्हे ते सुर्‍याबाला दाखवतात असे त्याचे म्हणणे आहे. यात्रेच्या कालाधीत बिरोबाची रात्री दहा नंतर पालखी निघते. मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा पहाटॆ पर्यत काढली जाते. याच पध्दतीने नवरात्र उत्सवात देखील घटस्थापने पासून विजयादशमीपर्यत पालखी काढली जाते.बिरोबा देवाला जाण्यासाठी मिरज-पंढरपूर मार्गावरील नागज फाटा येथे उतरून जावे लागते.नागज फाटा ते आरेवाडी अंतर अडीच किलो मीटर आहे. बनात जाण्यासाठी येथूना खासगी वाहतूक व बसेसची सोय आहे.