मुख्य विभाग

बागेतील गणपती पीडीएफ प्रिंट ई-मेल

सांगलीतून हरिपूरकडे कृष्णा-वारणेच्या संगमाकडे वाटेत जाताना हमखास थांबण्याची एक ठिकाण आहे.ते म्हणजे पुरातन श्री गणपती मंदिर व त्या भोवतालची दाट झाडी.त्यामुळे या ठिकाणाला बागेतला गणपती असे म्हणतात.धार्मिक माहात्म्या बरोबरच एक पिकनिक स्पॉट म्हणून हे रम्य ठिकाण लोकप्रिय होत आहे.

गणेशाची नगरी म्हणून सांगलीची ओळख आहे. या गणप्ती मंदीरापेक्षाही हे पुरातन मंदीर आहे.मिरज जहागिरीच्या गोविंद हरी पटवर्धन यांनी या देवाल्याची स्थापना केली.पूर्वी या भागाला बोरवन व गायरान म्हणून ओळ्खले जाई.या ठिकाणच्या सुपीक जमिनीत चिंचेची झाडे मुद्दाम एका रांगेत लावली होती एका बैराग्याने ती चिंचेची बाग तयार केली चिंचेच्या झाडापुढे मोठी बाग करण्यत आली तिला ’हरिपूर’ बाग असे म्हणतात.आता बाग निघून गेली तरी या देवालयाला ’बागेतला गणपती’ म्हणतात श्रावणात प्रत्येक सोमवारी हरिपूर येथे मोठी यात्रा असते. यात्रेला जाणारे भाविक हमखास बाहेतल्या गणपतीला जातात.येथे जेवण्या-खाण्याची व्यवस्था झाल्याने अनेक हौशी मंडळी घरगुती समारंभाच्या निमित्ताने खास वनभोजन आयोजित करतात.