मुख्य विभाग

स्वागतकक्ष पर्यटन मंदिरे गुड्डापुरची धानम्मादेवी
गुड्डापुरची धानम्मादेवी पीडीएफ प्रिंट ई-मेल

श्री धानम्मदेवी महाराष्ट्र,कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील वीरशैव लिंगायत समाजाच्या लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे.जत पासून २२ किलोमीटर पूर्वेला गुड्डापूर गावी देवीचे मंदीर आहे.
ऎतिहासिक गावात बाराव्या शतकात आई सिरस्म्मा व वडील अनंतराया यांच्या घरी धानम्मादेवीने जन्म घेतला धार्मिक वृत्तीच्या धानम्माने समाजातील अनिष्ट रूढी,परंपरा व अंधश्रध्दा नष्ट करण्यासाठी  वयाच्या दहाव्या वर्षापासूनच प्रयत्न सुरू केले.जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी भारतभर भ्रमण करून सामाजिक विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला.आद्य समाजसुधारक म्हणून गणल्या गेलेल्या माहेर व सासर जत तालुक्यात आहे.
श्रीधानम्माने आपल्या अवतारकार्या नतंर गुड्डापुर येथे समाधी घेतली.त्याच्या कार्याने प्रभावित झालेल्या लोकांनी पार्वतीचा अवतार समजून त्यांची पूजा सुरू केली.कार्तिक पौर्णिमेला देवाची यात्रा भरू लागली.मंदिर हे हेमाडपंथी शैलीतील भव्य व दगडी आहे.गाभार्‍यात देवीची ध्यानस्त बसलेली मुर्ती आहे.मुख्य मंदिराच्या पश्चिमेला देवीचे पती सोमनाथ यांची समाधी आहत. मंदिरासमोर दोन संभामडप आणि बाजूने पोवळ्या आहेत.मंदिरात प्रवेश करण्यासाठी भव्य कमान आहे.
   सुसज्ज मंगल कार्यालय आहे.दरवर्षी शेकडो विवाह येथे पार पडतात. सर्वात महत्वाचे म्हण्जे ट्रस्टने भक्तांसाठी अन्नछ्त्र सुरू केले आहे.भक्तांसाठी मोफत भोजन दिले जाते.अनेक भक्तं त्याचा लाभ घेतात.दिवसातून तीनदा पूजा बांधली जाते.त्यामुळे कोणत्याही वेळी येणार्‍या भक्तांना एकातरी पूजेचा लाभ मिळतो.