मुख्य विभाग

स्वागतकक्ष पर्यटन मंदिरे करगणीचे लखमेश्वर 
करगणीचे लखमेश्वर  पीडीएफ प्रिंट ई-मेल

दक्षिण भारतात शंकराची प्रत्यक्ष आत्मलिंगे असलेली तीन तीर्थ क्षेत्रे आहेत.त्यापैकी एक आटपाडी तालुक्यातील करगणी येथील लखमेश्वर (श्रीराम मंदिर) होय.

हा परिसर म्हणजे रामाणयातील दंडकारण्याचा भाग होय.मंदिराच्या आत व बाहेर अप्रतिम कलाकुसर आहे.सुदंर मोर, कृष्णावातारातील शिल्पे,वाद्ये वाजविणारा कलाकार समुद्रगुप्त व इतर नक्षीकाम सुदंर कोरलेले आहे.

येथे दरवर्षी महाशिवरात्रीच्या दुसर्‍या दिवसा पासून भव्य यात्रा भरते.पहिल्या दिवशी पारण्याचा कार्येक्रम होतो.पहिले दोन दिवस शेळ्या-मेढयांची यात्रा भरते.नंतरचे आठ दिवस माणदेशी खिलार जनावराची यात्रा भरते. सर्पूण यात्रेत कोटी रूपयावर उलाढाल असते.यात्रेत सांगली,कोल्हापूर,सातारा कर्नाट भागातून जनावरे दाखल होतात. हा सारा परिसर खिलार जनांवरानी फुलून जातो.