मुख्य विभाग

स्वागतकक्ष पर्यटन मंदिरे संगमेश्वरचे हरिपूर
संगमेश्वरचे हरिपूर पीडीएफ प्रिंट ई-मेल

सांगलीतून तीन किलो मीटरवर  पशिचमेस निसर्गारम्य हरिपूर आव आहे. हरिपूरला कृषणा-वारणेच्या संगमावरचे संगमेश्वरचे हरिपूर या ओळखीच्या स्वतंत्र खूणा आता पुसट होत चालल्या आहेत.अश्मयुगकालीन अवशेष सापडल्याची महाराष्ट्रातील जी काही ठिकाणे आहेत.त्यात सांगली जिल्हातील वाळवे, विटे, व हरिपूरचा समावेश आहे.ज्ञात इतिहासाप्रमाणे मिरजेचे संस्थानिक सरदार गोंविद हरी पटवर्धन यांनी वडिलांच्या स्मरणार्थ हरिपूर हे गाव वसवले.अगदी संगमाच्या काठावर संगमेश्वराचे प्रशस्त मंदिर आहे.मंदिरातील दगडी खांबावर कलाकुसर आहे.

गाभार्‍यातील शिवपिंड स्वयंभू असल्याची आख्यायिका आहे. देवस्थान समितीच्या वतीने येथे भक्त निवास व वांस्कृतिक सभागृहाची उभारणी सुरू आहे.श्रावणातील सर्व सोमवारी गर्दी वाढत आहे.सुपीक गाळमातीमुळे सुमारे साठ-पासष्ट वर्षापूर्वी हरिपूर गावात वीटभट्टीचा उद्योग सुरू झाला. आता इथली माती आणि उद्योगही संपला आहे.आता वीटभट्या नाहीत.येथे मोठया प्रमाणात हळद पेवे खोदण्यात आली आहेत..निसर्गरम्य कृष्णा-वारणेचा संगम आता वीटभट्ट्यामुळे उजाड झाला असलातरी बारमाही पाण्यामूळे अजून सौंदर्य टिकून आहे.

सांगलीचा तुरूंग फोडून पलायन करणार्‍या वसंतदादांना हरिपूर जवळच पलीकडे गोळी लागली होती.घाट परिसरात प्रशस्त बगीचाचे नियोजन आहे. संगमाच्या परिसरत बोंटीग क्लबचा प्रस्ताव आह..एक दिवसाच्या सहलीसाठी चांगले आनंद देणारे हे ठिकाण आहे.