मुख्य विभाग

बहे येथील रामलिंग बेट पीडीएफ प्रिंट ई-मेल
वाळ्वे तालुक्यातील बहे येथील रामलिंग बेट नागरिकाचे श्रध्दास्थान व पर्यटनस्थळ म्हणून सांगली जिल्हयात प्रसिध्द आहे. इस्लामपुरापासून तेरा किलोमीटर अंतरावर बहेलगत कृष्णा नदीच्या पात्रात हे रामलिंग बेट आहे.बेटावर चिंच, वड,पिंपळ,जाभूळ व इतर फुलझाडे यांसारख्या वृक्षवेलीनी परिसर सुशोभित आहे.

लंकेहून परत येताना श्रीरमचंद्र कृष्णा स्नानासाठी या ठिकाणी उतरले जवळच असलेल्या शिरटे गावात सीतामाई स्नानासाठी राहिल्या.श्रीरामांनी स्नान करून तेथे शिवलिंग स्थापले.शिवलिंगाची पूजा चालू असताना कृष्णेस उल्हास येऊन ती गर्जना करू लागली हनुमान जवळच उभे होते.महापुर येतोय असे पाहून त्यांनी नदीला आलेले पाणी दोन्ही बाहुनी थोपावले अशी आख्यायिका आहे. कृष्णा नदीला महापूर आल्याचार बेटाकडे जाण्याचे सर्व मार्ग बंद होतात.

अंत्यत रमणीय परिसरामुळे नागरिकंना विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून विकसित करण्यासाठी या बेटाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याची योजना राज्य शासनाने हाती घेतली आहे.यासाठी सहा कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे यापैकी पहिला हप्ता म्हणून शासनाने दोन कोटी रुपये दिले आहेत.

बेटवर येणार्‍या पर्यटकांना नौकाविहाराचा आनंद लुटता यावा, यासाठी बोटिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.अर्थमंत्री जयंत पाटील स्वत:या कामाकडे लक्ष देत आहेत.या बेटावर वर्षभर धार्मिक उत्सव सुरू असतात.पौष आमवस्येला मोठी यात्रा भरते .चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती असे उत्सव साजरे केले जातात. वाळवे तालुक्याबरोबरच जिल्हा व शेजारच्या जिल्हातून या बेटाला भेटी देण्यासाठी नागरिकाची वर्दळ असते. एक दिवसाची छोटी सहल आयोजित करण्यासाठी हे ठिकाण रमणीय व निसर्गसौदर्याने संपन्न आहे.