मुख्य विभाग

आमची सांगली पीडीएफ प्रिंट ई-मेल
आमची सांगली
( चाल-- राधा ही बावरी- या गीताची )

कृष्णेत स्नान, ओठात नाम, हातात झांज झणझणते ।
भजनात दंग, विसरून भान, ही वाट मंदिरी सरते ।
ही गणरायाची सांगली नगरी अशी सुमंगल होई ।
नाट्याची पंढरी, अशी ही, नाट्याची पंढरी ॥ १ ॥

संस्काराच्या सुमनाने, बालमनेही खुलताना ।
अध्ययनाच्या मदतीने, उत्तुंग झेप ही घेताना ।
सुपुत्र येथील मात्रृभूमिच्या चरणी मस्तक वाही ।
सर्वस्व अर्पुनी मात्रृभूमिला वैभव मिळवून देई ।
ही गणरायाची सांगली नगरी अशी सुमंगल होई ।
नाट्याची पंढरी, अशी ही, नाट्याची पंढरी ॥ २ ॥

विद्या येथे घरोघरी , विद्येच्या माहेरघरी ।
वैद्यकीय आणि तंत्रशिक्शणी, शिक्शण घेती कितीतरी ।
संगणकाच्या युगात येथे उंच भरारी घेई ।
उच्चशिक्षणा नाही बंधने विश्वच व्यापून राही ।
ही गणरायाची सांगली नगरी अशी सुमंगल होई ।
नाट्याची पंढरी, अशी ही, नाट्याची पंढरी ॥३॥

वरील कविता प्रत्यक्ष ऎका

प्रा. एच, यू. कुलकर्णी.