मुख्य विभाग

रामलिंग पीडीएफ प्रिंट ई-मेल
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावाजवळ धुळेश्वर व रामलिंग ही प्राचीन काळातील प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. हजारो वर्षापूर्वीची धार्मिक पार्श्वभूमी असलेली ही दोन्ही ठिकाणे आज पर्यटकांचे व भाविकांचे आकर्षण स्थळे म्हणून विकसित होत आहेत. धुळेश्वर, आलमप्रभू व रामलिगं ही तीन ठिकाणे जवळजवळ असल्याने खूप दूरवरून येणार्‍या पर्यटकांना एकावेळी तीन पुरातन क्षेत्रे पाहण्याची संधी मिळते.