मुख्य विभाग

चांदोली अभयारण्य पीडीएफ प्रिंट ई-मेल

चांदोली अभयारण्य सांगली,सातारा,कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील ३१७.६७ चौ. किलोमीटर परिसरात वसले आहे. राज्यातले निर्मनुष्य असणारे हे सर्वात मोठे अभयारण्य आहे.सह्याद्रीच्या पर्वतरागांमध्ये असलेल्या आणि निसर्गाच्या विपूल संपत्तीने नटलेल्या चांदोली अभयारण्यास राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला आहे. विविध प्रकारची झाडे,वृक्षवेली,औषधी वनस्पती,विविध प्राणी या सर्वामुळे चांदोलीचे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांचे आकार्षण ठरत आहे. या अभयारण्यात सांबर,गवा,गेळा,अस्वल,भेकर,कोंळ्शिदा,तरस,साळिदंर,खवले मांजर,रानकुत्रा,कोल्हा.डुक्क्कर या विविध जातीचे सुमारे दीड हजार प्राणी तसेच रानकोबडे,मोर,गरूड.घार.घुबड असे विविध जातीचे पक्षी अढळून येतात.

चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून ३० किलोमीटर जास्त अंतरापर्यंत पाण्यातून बोटीने प्रवास करता येतो. कलावंतीणीची विहीर, कंदहाराचा धबधबा, शिवशाही साक्ष देणारा इतिहासकालीन प्रचितगड, भैरवगड, वाल्मिकी मंदिर, झोळंबीचा सडा, रामनदी, प्राचीन मंदिरे हे सर्व पाहण्यासाठी अभयारण्याच्या वारणावती येथील कार्यालयाकडून परवानगी घ्यावी लागते. निसर्गाच्या विपूल संपत्तीने नटलेल्या या अभयारण्याचे सौंदर्य टिकवून ठेवणे व दुर्मिळ वनौषधी व वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्राच्या संघटनेच्या ’हेग’या आंतरराष्ट्रीय कार्यालयाकडून मान्यता मिळाल्यास "चांदोली राष्ट्रीय उद्यान" देशातील एक महत्वाचे पर्यटन केंद्र म्हणून नावलौकीक मिळवेल.