मुख्य विभाग

सागरेश्वर अभयारण्य पीडीएफ प्रिंट ई-मेल

श्री सागरेश्वर अभयारण्य हे सांगली जिल्ह्यातील एक रम्य,निसर्गसौंदर्यांने नटलेले,प्राणी,पक्षीनी समृध्द असे पर्यटन स्थळ आहे. कडेगाव वाळवा व पलूस तालूक्याच्या सीमा जोडणार्‍या सह्याद्रीच्या सागरेश्वर पर्वताच्याअ माथ्यावर हे ठिकाण आहे.अभयारण्या मध्ये उष्ण-कोरडया हवामानातील पानझडी,काटेरी वनस्पती जास्त प्रमाणात आढळतात. धावडा, वड,पिपळ,आपटा ,सीताफळ तसेच माकडी धायटी,घाणेरी ,करवंद,सालफळ आदी झुडपे आढळतात.अभयारण्यातील साळिंदर,सांबर,चितळ,काळ्वीट,खोकड,कोल्हा,लांडगा,तरस आदी प्राणी पर्यटकांसाठी आकर्षण आहेत.धामण,नाग,मरण्यार घोरपड,हे सरपटणारे प्राणी आहेत.श्री सागरेश्वर मंदिर परिसरत सुमारे १०८ शिवालयांची विविध नावाची ओळखली जाणारी मंदीरे आहेत.                         

देवराष्ट्रेच्या हद्दीत सागरेश्वराचे एक फार प्राचीन मंदिर आहे. मुख्य मंदिराच्या सभोवताली लहान-मोठी ४० ते ५० मंदिरे आहेत.सागरेश्वर, कुसमेश्वर,काशीविश्वेश्वर,वैद्यनाथ,रमणेश्वरी,  सत्तेश्वरी, नदीकेश्वर,  पर्वतेश्वर, प्राणेश,  धर्मेश,  वीरभद्रा, लक्ष्मणेश्वर,   ओमकारेश्वर, कर्कट स्वामी समाधी, मारुतेश्वर, अंबाबाई, तारकेश्वर, त्र्यंवकेश्वर आदी प्रमुख मंदिरे आहेत. ही सर्व मंदिरे महादेवाची असून सर्वांची बांधणी सारखीच आहे. मध्यभागी असणारे देऊळ सर्वात प्राचीन असून ते समुद्रेश्वराचे आहे. दरवर्षी श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी यात्रा भरते.पर्यटकांसाठी अभयारण्यात वन विभागाने विश्रामगृहाची सुविधा निर्माण केली आहे. त्यासाठी चार कक्षा आहेत. सुमारे २५ लोकांसाठी युवक गॄह असून पर्यटकांनी वन्यजीव उपवन संरक्षक कोल्हापूर येथून आरक्षण करावे,अशी अपेक्षा आहे.अलीकडे सांगली,कोल्हापूर,सातारा,पुणे आदी भागातून पक्षीनिरीक्षक, व वनप्रेमी अभ्यासकांची सतत वर्दळ असते.त्यांचे अभयारण्याबद्दलचे अनुभवही सागरेश्वरचे महत्व वाढविणारे आहेत