मुख्य विभाग

स्वागतकक्ष संस्था परिचय सामाजिक संस्था मराठी विज्ञान प्रबोधिनी, सांगली.
मराठी विज्ञान प्रबोधिनी, सांगली. पीडीएफ प्रिंट ई-मेल
जुलै १९८० पासून सांगलीत मराठी विज्ञान प्रबोधिनी ही मराठीतून विज्ञान प्रसार करणारी संस्था कार्यरत आहे. गेली २० वर्षे विविध उपक्रमांतून विज्ञान प्रसाराचे व समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याचे काम संस्था करीत आहे. डॉक्टर्स, प्राध्यापक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते असे सुमारे २०० कार्यकर्ते संस्थेचे आजीव सभासद आहेत. सन १९८१ ला अखिल भारतीय मराठी विज्ञान समंेलन संस्थेने सांगली येथे आयोजित केले होते. सन १९९३ला राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीच्या सहकार्याने साखराळे येथे संस्थेने अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलन भरविले होते. याशिवाय आकाशवाणीच्या सहकार्याने म्हैसाळ येथे ग्रामीण विज्ञान संमेलन तर सांगलीतील इतर संस्थांच्या मदतीने फिरते तारांगण, विज्ञान प्रदर्शन, आकाश दर्शन, व्याख्याने, फिल्म, स्लाईड शो, विज्ञानसहली असे कार्यक्रम राबविले जातात.
दरवर्षी नित्यनियमाने विद्यार्थ्यांसाठी विज्ञानविषयक वक्तृत्व, निबंध लेखन, चित्रकला, विज्ञान उपकरण, प्रश्नमंजुषा इत्यादी स्पर्धा घेतल्या जातात. सांगली जिल्हा हे संस्थेचे कार्यक्षेत्र असल्याने जिल्यातील विविध शाळांतून बहुसंख्येने विद्यार्थी यात भाग घेतात. आजपर्यंत प्रा. म. वा. जोगळेकर, कै. श्री. वि. ह. केळकर, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, डॉ. य.शं. तोरो, डॉ. रविंद्र व्होरा, डॉ. सु. वि. रानडे, श्री. गो. पां. कंटक इत्यादी व्यक्तींनी संस्थेचे अध्यक्षपद भूषविले असून आता श्री. तानाजीराव मोरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि कार्यवाह श्री. अरविंद यादव यांच्या देखरेखीखाली संस्थेेचे कार्य चालू आहे. येथे असून रु. २०० भरून कोणीही विज्ञानप्रेमी या संस्थेचा आजीव सदस्य होऊ शकतो. विज्ञान प्रसाराच्या या कार्यास भरीव आर्थिक साहाय्याची आवश्यकता असून सदस्य व इतर संस्थांनी याकामी सहकार्य करावे असे आवाहन संस्थेच्या विश्वस्त श्री मती उषा कुलकर्णी यांनी केले आहे. संस्थेचे कार्यालय - मराठी विज्ञान प्रबोधिनी,
द्वारा राणी सरस्वती कन्याशाळा, पेठभाग, सांगली,फोन - ३७३०८५