मुख्य विभाग

स्वागतकक्ष संस्था परिचय सहकारी संस्था सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती
सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती पीडीएफ प्रिंट ई-मेल
शेतकर्‍या ंनी उत्पादित केलेल्या शेतीमालास योग्य भाव मिळावा व्यापारी व दलालांच्या दृष्ट चक्रव्यूहात त्याची लुबाडणूक, पिळवणूक होऊ नये म्हणून स्व.वसंतराव दादांनी शेतीमालाच्या देवाण-घेवाणीवर नियमण ठेवण्यासाठी सन १९५१ साली सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगलीची स्थापना केली.
स्व. वसंतरावदादा पाटील हे या संस्थेचे संस्थापक व पहिले अध्यक्ष होत.
भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. शेती हे येथील नागरिकांच्या उपजिवीकेचे मुख्य साधन आहे. म्हणून माझ्या देशात शेतीप्रधान व शेत मालावर आधारित विविध प्रक्रिया वा तत्सम उद्योगधंदे वाढल्याशिवाय येथील शेतकर्‍या ंची व पर्यायाने माझ्या देशाची प्रगती होणार नाही. म.ज्योतिराव फूले यांनी त्यांच्या शेतकर्‍या ंविषयी लिहलेल्या ``आसूड'' या ग्रंथात नमूद केले आहे. त्याच संकल्पनेतून स्व. वसंतरावदादा पाटील यांनी सन १९५१ साली सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना करून श्ेातकरी व व्यापारी यांना समतोल न्याय देण्यासाठी या संस्थेची स्थापना केली. इतकेच नव्हे. तर शेतकर्‍या ंने उत्पादित करून आणलेल्या व व्यापार्‍या ने खरेदी केलेल्या मालाची चढउतार करणार्‍या व त्याचे न्याय देण्यासाठी हमाल-तोलाईदार याना न्यास देण्यासाठी हमाल-तोलाईदार यांच्या एका प्रतिनिधीस संचालक मंडळात समाविष्ट करून घेण्याचा कायदा या संस्थेच्या स्थापनेपासूनच केला आहे. तशी नोंद या संस्थेच्या उपविधीमध्ये करण्यात आलेली आहे.
आज या बाजार समितीचा अध्यक्ष या नात्याने आपणांसमोर स्वत:ला सादर करताना मला विशेष समाधान वाटते की, मा. आमदार मदनभाऊ पाटील यांच्या खंबीर नेतृत्वाखाली वाटचाल करीत असलेल्या सध्या या बाजार समितीच्या वतीने सांगली येथे मार्केट यार्डात धान्य, नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या कोल्हापूर रोडवरील विष्णू आण्णा पाटील फळे व भाजीपाला मार्केट, तसेच आर्यविन पूला श्ेाजारी टिळक मंदीराजवळ जनावरांचा बाजार तसेच मिरज येथे धान्य व जनावरांचा बाजार, कवठेमहांकाळ व जत येथे धान्य व जनावरांचा बाजार. तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमेबरोबरच सांगली व सोलापूर जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या माडग्याळ ता. जत व ढालगांव ता. कवठेमहांकाळ येथे पशु धन्याच्या खरेदी विक्रीवर नियमन करणार्‍या आमच्या शाखा सक्षमपणे कार्यरत आहेत.
दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक राज्यांच्या शेतीमालाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांवर नियमन करीत असताना आमच्या बाजार समितीच्या वतीने आम्ही केवळ नियमन करून थोबलो आहोत असे नव्हे तर नियमना बरोबरच आम्ही इथे व्यवहारासाठी येणार्‍या प्रत्येक व्यक्तीस आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा पूरविल्या आहेत. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या १०० एकर इतक्या एरियात रस्ते, लाईट, स्ट्नीट लाईट, पिण्याचे पाणी, विश्रांतीसाठी बगीचा उद्याने याच बरोबर जनावरांसाठी स्वच्छ पाण्याचा हौद, आदीसह आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवित असताना ऐन उन्हाळयाच्या दिवसात व्यापारी वर्गाच्या सहकार्याने ठिकठिकाणी सर्वांना थंड पाणी मिळावे म्हणून पाणपोई, पथदर्शक व माहितीदर्शक फलके यांची सोय केलेली आहे. प्रत्येक पथदर्शक फलकांवर विविध घोषवाक्ये लिहून सामाजिक जनजागृतीही करीत आहोत. त्याचप्रमाणे वसंुधरेला रूजवण्याचा अल्पसा पयत्न म्हणून आम्ही रस्त्यांच्या दूतर्फा वृक्षरोपणही केले आहे. आज ती झाडे प्रचंड महाकाय रूप धारण करून अनेकांना शितल व शांत सावली देत आहेत.
दरम्यान येथील दररोजची प्रचंड उलाढाल लक्षात घेता भूरट्या चोरांचे प्रमाण मध्यंतरी वाढले होते परंतु येथून स्थलांतरीत झालेल्या पोलीस स्टेशनची चौकी आम्ही येथे पून्हा कार्यरत करण्यात यशस्वी झालो आहोत. त्याच बरोबर रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत बाजार समितीचे मुख्य दरवाजेच बंद केले जात आहेत. त्यामुळे भूरट्या चोर्‍या ंच्या प्रमाणात कमालीची घट झाली आहे. त्याचबरोबर त्रासदायक ठरणार्‍या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहिमही हाती घेतली असून ती यशस्वी होत आहे.
नजिकच्या काळात आमच्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बेदाणा व सर्व प्रकारच्या अन्नधान्याचे सौदे आम्ही लवकरच सुरू करणार आहोत. तर आपला माल घेऊन येणार्‍या शेतकर्‍या ंच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त अशी धर्मशाळा बांधण्याचा आमचा मनोदय असून माकेट यार्ड येथे वे ब्रीज व विष्णू आण्णा पाटील फळे व भाजीपाला मार्केट येथे लवकरच पेट्नेल पंप उभारण्याची महत्वकांक्षी काम हाती घेण्याचा संकल्प सर्व संचालक मंडळ व आमचे नेते मा.आमदार मदनभाऊ पाटील यांनी केला आहे. सध्या शेतकर्‍या ंच्या मूला-मुलींचे विविह थाटामाटात व्हावेत. म्हणून आम्ही येथेएक मंगल कार्यालयही बांधले आहे. याचा लाभ दूरवरचे अनेक शेतकरी बांधव घेत आहेत.
विशेष म्हणजे येथील हळदीचे सौदे देशभरात प्रसिध्द आहेत. म्हणूनच संयुक्त कर्नाटक विजय कर्नाटक, भास्कर, जागरण आदि विविध राज्यांतील बहुभाषिक वृत्तपत्रांमध्ये येथील हळद सौद्याची माहिती सातत्याने प्रकाशित होत असते. त्यामुळे संपूर्ण देशभरातील हळद व्यापार्‍या ंचे लक्ष आमच्या बाजार समितीने स्वत:च्या कौशल्यपूर्ण पारदर्शक कारभाराकडे केंद्रित केले आहे. याशिवाय शेतकरी व व्यापारी वर्गाच्या सोयीसाठी विविध बँकाच्या शाखा बाजार समितीच्या सहकार्याने येथे आम्ही कार्यरत केल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍या ंना रोख रक्कमेऐवजी देशभरातील कोणत्याही ठिकाणचे डी.डी. मिळण्याची सोय झाली आहे. एकंदर म.ज्योतिबा फूले यांच्या विचार सरणीतून स्वर्गीय वसंतराव दादांच्या संकल्पना पूर्ण करण्याचा आमचा संकल्प पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ, कर्मचारी व व्यापारी अडते कटिबध्द आहेत.